हमीभावाने हरभरा खरेदीसाठी शेतकरी ऊत्पादक कंपन्यांकडून प्रारंभ

In Hingoli district farmers have started buying gram with guaranteed price
In Hingoli district farmers have started buying gram with guaranteed price

हिंगोली : जिल्ह्यातील महा एफ.पी.सी.च्या वतीने निर्धारित केंद्रावरून आधारभूत किंमतीने हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या वतीने ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. पाच हजार १०० रुपये प्रती क्विटल या दराने हरभऱ्यांची खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती महा एफ.पी.सी. च्या वतीने देण्यात आली असल्याचे जिल्हा समन्वयक आनंता पाटील यांनी सांगितले. 

हरभरा खरेदी व नोंदणीसाठी जिल्ह्यामध्ये फाळेश्वर महाराज प्रोड्युसर कंपनीच्या वतीने केंद्र प्रमुख मारोती वैद्य तसेच रेशीम उद्योग प्रोड्यूसर कंपनीचे केंद्र प्रमुख आर.वाय.भिसे, सेनगांव तालुक्यामध्ये किसान दिशा प्रोड्यूसर कंपनी जवळा बुद्रुकचे केंद्र प्रमुख आनंता पाटिल, बसवेश्वर प्रोड्युसर कंपनी कोळसा येथील केंद्र प्रमुख उमाकांत माळोदे, कळमनुरी तालुक्यामध्ये कयाधू प्रोड्युसर कंपनी येथे केद्र प्रमुख निलेश पतंगे, गोमाफार्म प्रोड्यूसर कंपनी येथे केंद्र प्रमुख मारोती वैद्य, गजानन साई फार्मर प्रोड्यूसर कंपनी बोल्डाफाटा येथे केंद्र प्रमुख सुरेश शिंदे, दत्तगुरू फार्मर प्रोड्युसर कंपनी उमरा (माहेर) येथे केंद्र प्रमुख गंगाधर श्रृगारे, वसमत मध्ये सुर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी सातेफळ येथे केंद्र प्रमुख प्रल्हाद बोरगड तर औंढा नागनाथमध्ये स्वस्तीक फार्मर प्रोड्यूसर कंपनी जवळा बाजार येथे केंद्र प्रमुख अंकित डोंबे, नागनाथ शेतकरी उत्पादक कंपनी औढा नागनाथ येथे केंद्र प्रमुख बालाजी पोले. 

सध्या बाजारामध्ये आधारभूत किंमतीपेक्षा हरभऱ्याला कमी दर मिळत आहे. तरी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून आधारभूत किंमतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक आनंता पाटील यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com