हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयात पाण्याची व्यवस्था नसल्याने रुग्णांची तारांबळ

राजेश दारव्हेकर
Sunday, 27 December 2020

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागला मात्र उपचारासाठी दाखल रुग्णांना पिण्याची पाण्याची साधी व्यवस्था रुग्णालायाकडून झाली नाही.

हिंगोली : येथील कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने बाहेरील पाण्यावर तहान भागविण्याची वेळ त्यांच्या आली आहे.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागला मात्र उपचारासाठी दाखल रुग्णांना पिण्याची पाण्याची साधी व्यवस्था रुग्णालायाकडून झाली नाही. एवढा पैसे येऊन देखील रुग्णालय प्रशासन उदासीन आहे. रुग्णालयात हजारो रुपये खर्च करून वॉटर फिल्टर बसविण्यात आले. मात्र त्या ठिकाणी पाणी पोहचत नसल्याने ते देखील आजघडीला धूळखात पडले आहेत. याकडे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

हेही वाचा - स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाची पेट- २०२० परीक्षा दोन टप्प्यात -

कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे दहा कोटीचा निधी शासनाने दिला असतानाही मास्क व सँनिटायझरचा तुटवडा कसा असा प्रश्न पडला होता. नर्स, परिचारक रात्रंदिवस सेवा बजावत असताना त्यांना मास्क मिळत नसल्याची खंत काहींनी व्यक्त केली होती. आजघडीला रुग्णालयात मास्क उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. काही वॉर्डात स्वच्छतागृहाची साफ सफाई होत नाही, तर काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधी पसरली असल्याने रुग्णाचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. पाण्यामुळे सार्वजनिक शौचालय देखील धूळखात पडले आहे. कोरोना काळातही औषधीचा तुटवडा, रुग्णालय हे अस्वच्छतेचे माहेर घर म्हणून ओळखत होते. आता नवीन जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासमोर खूप मोठे आव्हान आहे. रुग्णालयात डॉक्टर वेळेवर उपस्थित न राहणे, खाजगी दवाखाने चालविणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करतील काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: District General Hospital has no water supply hingoli news