esakal | हिंगोलीत एक दिवसाच्या विश्रांतीनंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

हिंगोलीत एक दिवसाच्या विश्रांतीनंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली - जिल्ह्यात एक दिवसाच्या विश्रांती नंतर परत बुधवार ता. १५ दुपारी दोन पासून ते चार वाजेपर्यंत पावसाच्या सरींवर सरी कोसळत होत्या नंतर पावसाची सारखी सुरू झालेली रिपरिप रात्री उशिरापर्यंत कायम होती. दरम्यान जिल्ह्यात सरासरीच्या १११ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे.

जिल्ह्यात शनिवार, रविवारी व सोमवार असा सलग पाऊस झाला. मंगळवारी पावसाने दिवसभर उघडीप दिली. कडक ऊन देखील पडले होते. बुधवार दुपार पर्यंत ढगाळ वातावरण होते. दोन वाजता रिमझिम पाऊस सुरू झाला. नंतर थ़ोडा वेळ थांबला त्यानंतर पाच ते दहा मिनिटाच्या अंतराने दोन ते चार यावेळी सरींवर सरी सुरू झाल्या त्यानंत मात्र पावसाची सारखी रिमझिम सुरू झाली ती रात्री उशिरापर्यंत कायम होती.

दरम्यान, यावेळी अधुन मधून जोराचा पाऊस देखील पडत होता. हिंगोली सह कळमनुरी, औंढा, वसमत व सेनगाव तालुक्यातील बहुतांश भागात हा पाऊस झाला. या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. आज दुपार पासून ढगाळ वातावरण पालसाची रिपरिप सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

loading image
go to top