हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत १२१ मिलिमीटर पावसाची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत १२१ मिलिमीटर पावसाची नोंद

हिंगोली : जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस झालाच नाही. असे असले तरी पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १५७.९ मिलिमीटर अपेक्षित असताना १२१.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ऊन व ढगाळ वातावरण आहे. मात्र, पावसाने हुलकावणी दिली आहे. औंढा नागनाथ तालुक्यात इतर तालुक्यांपेक्षा अपुरा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात जून महिना अखेर सर्व सामान्य पाऊस १५७.९ मिमी होणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ १२१.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत ७६.८ टक्के पाऊस झाला आहे.

हिंगोली तालुक्यात सर्वसाधारण १६०.९ मिमी अपेक्षित पाऊस असताना १४०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही टक्केवारी ८७.१ टक्के आहे. कळमनुरी तालुक्यात १६०.४ मिलिमीटर अपेक्षित पाऊस असताना ११३.१ मिलिमीटर पाऊस झाला. त्याची टक्केवारी ७०.५ आहे. वसमत तालुक्यात १५१.६ मिलिमीटर अपेक्षित असताना ११६.१ मिलिमीटर पाऊस झाला. टक्केवारी ७६.६ आहे. औंढा नागनाथ तालुक्यात १२५.६ मिलिमीटर अपेक्षित असताना १२९.२ मिलिमीटर पाऊस पडला. टक्केवारी १०२.९ टक्के आहे. सेनगाव तालुक्यात १५१.७ मिलिमीटर अपेक्षित पाऊस असताना १०७.५ मिलिमीटर पाऊस झाला. त्याची टक्केवारी ७०.९ आहे.

मागील चोवीस तासांत बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ०.५० मिलिमीटर पाऊस झाला. यात हिंगोली तालुका ०.२० मिलिमीटर, कळमनुरी निरंक, वसमत १.०३, औंढा निरंक तर सेनगाव तालुक्यात ०.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ३० महसूल मंडळापैकी नऊ मंडळात अत्यल्प पाऊस झाला आहे. तर, २१ मंडळात अपेक्षित पाऊस झाला आहे.

Web Title: Hingoli District Received 121 Mm Rainfall Far Farmer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top