हिंगोली जिल्‍ह्यात ५७ गट अन् ११४ गणांची रचना

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियमांन्वये
Hingoli Zp
Hingoli ZpSakal

हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेचे ५७ गट तर पंचायत समितीच्या ११४ गणांची रचना, सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. आक्षेपांवर झालेल्या सुनावणी नंतर काही ठिकाणीच किरकोळ बदल झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या ५७ एवढी निश्चित करण्यात आली आहे. तर, हिंगोली पंचायत समिती २२, कळमनुरी पंचायत समिती २४, सेनगाव पंचायत समिती २२, औंढा पंचायत समिती २०, वसमत पंचायत समिती २६ अशी एकूण ११४ सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियमांन्वये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती क्षेत्र जितक्या निवडणूक विभागात विभागण्यात येईल, त्या निवडणूक विभागाची संख्या, निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती निश्चित केली आहे. हे आदेश व अनुसूची जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व तहसील कार्यालये व पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com