esakal | हिंगोली : जिल्ह्याची खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी ४८.३५ टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

खरीपाची सुधारित पैसेवारी ४८.३५ टक्के एवढी काढण्यात आली आहे . ५० टवकेच्या खाली पैसेवारी असल्याने शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ मिळणे सोईचे ठरणार आहे.

हिंगोली : जिल्ह्याची खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी ४८.३५ टक्के

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : यंदाच्या खरीप हंगामातील जिल्ह्याची हंगामी पैसेवारी ६४. ५९ टक्के इतकी काढण्यात आली होती. शनिवारी (ता. ३१) जाहीर झालेल्या पैसेवारीमध्ये आता घट झाली असून खरीपाची सुधारित पैसेवारी ४८.३५ टक्के एवढी काढण्यात आली आहे. ५० टक्केच्या खाली पैसेवारी असल्याने शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ मिळणे सोईचे ठरणार आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांचे कसान झाले. त्यामुळे पैसेवारी कमी काढण्याची मागणी होती. सुधारित पैसेवारीमध्ये बदल झाला. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात लागवडी योग्य  क्षेत्र हे चार लाख दोन हजार ६१.३२ हेक्टर एव्हढे आहे. त्यातील तीन लाख हजार १८०.०३ हेक्टरवर खरीपाची पेरणी करण्यात आली. तर १८ हजार ३८१.२९  हेक्टर पडीक आहे. त्यामध्ये हिंगोली तालुक्यात हजार १५ हेक्टर क्षेत्र लागवडी आहे. त्यापैकी ८० हजार १४४ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. 

सेनगाव तालुक्यात ९२ हजार ६९९.४४ हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे. त्यापैकी ९० हजार २४२.६ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कळमनुरी तालुक्यात ७६ हजार ६९५.९७ हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे. त्यापैकी ७३ हजार ९९९.९७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. वसमत तालुक्यात ८० हजार २८ हेक्टर लागवडी खाली आहे.  त्यापैकी ७८ हजार ७०२ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. 

औंढा नागनाथ तालुक्यात ६३ हजार १२२. ९१ हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे. पेरणी केलेल्या क्षेत्रावरील पिकाची सुधारित पैसेवारी शनिवारी (ता. ३१) जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सर्व गावाची पैसेवारी पन्नास टक्केच्या खाली आहे.

जिल्ह्याची पैसेवारी ४८.३५ टक्के काढण्यात आली आहे. त्यामध्ये तालुकानिहाय पैसेवारी पुढील प्रमाणे आहे .

कंसात हंगामी पैसेवारी हिंगोली तालुक्याची सुधारित पैसेवारी ४८.२९ (७०.०१ ) टक्के , सेनगाव तालुक्याची ४७.८८ (६५.१७ ) टक्के , कळमनुरी तालुक्याची ४८.४३ (५८.९ ८ ) टक्के , वसमत तालुक्याची ४८ ( ६५ ) टक्के तर औंढा नागनाथ तालुक्याची ४ ९ .१३ (६३ ) टक्के पैसेवारी जाहिर करण्यात आली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image