esakal |  हिंगोली : घरोघरी दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची लगबग, झेंडूला आला भाव
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लक्ष्मीपूजनानिमित्त नोटा , नाणी तसेच सोन्या चांदीच्या शिक्क्यांवरील लक्ष्मीच्या छापांची पूजा करण्याचीही प्रथा आहे . शुक्रवारी  धनत्रयोदशीनिमित्त  आरोग्याची देवता धन्वंतरी , धनाची देवता कुबेर , लक्ष्मी , गणपतीची पूजा करण्यात आली . दरम्यान शनिवारी लक्ष्मीपूजन असल्याने  व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजाचे साहित्य खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती .

 हिंगोली : घरोघरी दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची लगबग, झेंडूला आला भाव

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : कोराना संकटाला बाजुला सारत हिंगोलीच्या बाजारपेठेत दोन दिवसापासून दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे. शनिवारी (ता. १४ ) लक्ष्मीपूजन करण्यासाठी लागणारे पुजेचे साहित्य खरेदी करण्याची सकाळी लगबग सुरू होती. झेंडुच्या फुलांना शंभर रुपये किलोचा भाव मिळाल्याने उत्पादक समाधानी होते.

लक्ष्मीपूजनानिमित्त नोटा, नाणी तसेच सोन्या चांदीच्या शिक्क्यांवरील लक्ष्मीच्या छापांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. शुक्रवारी धनत्रयोदशीनिमित्त आरोग्याची देवता धन्वंतरी, धनाची देवता कुबेर, लक्ष्मी, गणपतीची पूजा करण्यात आली. दरम्यान शनिवारी लक्ष्मीपूजन असल्याने  व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजाचे साहित्य खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती .

लक्ष्मीपूजनासाठी लागणारे लाह्या , बत्तासे, लक्ष्मी मुर्ती, लालरंगाच्या  वह्या  व इतर साहित्य खरेदीसाठीही दुपार  पर्यंत लगबग सुरू होती. कोरोनाला बाजुला करत बाजारात खरेदी सुरू झाल्याने विक्रेते देखील खुश दिसत आहेत.  शनिवारी नरकचतुर्दशी निमित्ताने  अभ्यंग स्नान करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.  घरासमोर  आकर्षक रांगोळीही काढल्या होत्या . 

हेही वाचा  नांदेड जिल्ह्यात एक हजार १९२ कोटींची कर्जमाफी -

लक्ष्मीपूजनासाठी दुपारी १२.१० ते ४:३० पर्यंत व सायंकाळी पावणेसहा ते रात्री ८:३३ वाजेपर्यंत , रात्री ९ : १० ते १२.२१ पर्यंत लक्ष्मीपूजनासाठीचा शुभ मुहूर्त होता असे जवळेकर गुरु यांनी सांगितले. अनेकांनी आपल्या सोयी प्रमाणे मुहूर्त ठरवत लक्ष्मी पुजनाची तयारी केली. तर काही ठिकाणी लक्ष्मी पुजन करण्यात आले.

झेंडूच्या फुलाना मात्र चांगलाच भाव मिळाला शंभर ते १२० रुपये प्रमाणे झेंडूची विक्री झाली. यावर्षी  परतीच्या पावसामुळे फूलशेतीचे मोठे नुकसान झाले होते .  दसऱ्याच्या दिवशी  पन्नास रुपये प्रमाणे फुलांची विक्री झाली होती. दिवाळीला शहरात मोठ्या प्रमाणात फुलांची आवक व

झाली मात्र  दर शंभरावर गेले होते. यासह झेडुचे हार देखील देखील विक्री साठी उपलब्ध झाले होते ते पंचवीस ते पन्नास रुपये प्रमाणे विकत होते. शहरात जिल्हा भरातून  झेंडूचे फुले विक्रीसाठी बाजारात आले होते. घरोघरी आंब्याचे तोरण व झेडूच्या फुलाचे हार लावण्यात आले होते.

संपादन-  प्रल्हाद कांबळे