Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Mild Earthquake Hits Hingoli District: हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात शनिवारी ३.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. वसई परिसरात धक्का जाणवला असला तरी सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
Hingoli

Hingoli

esakal

Updated on

पंजाब नवघरे

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (ता. ११) सकाळी ११.२६ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. औंढा नागनाथ तालुक्यातील वसई गाव परिसरात भूगर्भातून मोठा आवाज ऐकू आल्याचे तसेच काही ठिकाणी सौम्य धक्का जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com