हिंगोली : नियोजन समितीच्या बैठकीत शिक्षण, क्रीडा संकुल, सौरपंप विषय चांगलेच गाजले

राजेश दारव्हेकर
Monday, 25 January 2021

येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत नियोजन समितीची बैठक झाली.

हिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी ( ता. २५ )शिक्षण, क्रीडा संकुल, सौरपंप, रोहित्र वाटप हे विषय चांगलेच गाजले तर हंगामी वसतीगृहावरून शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांना पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले.

येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत नियोजन समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, खासदार अँड.राजीव सातव, खासदार हेमंत पाटील , आमदार विप्लव बाजोरीया, तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजु नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर आदींची उपस्थिती होते. 

हेही वाचा शिवा संघटनेचा ‘रौप्य महोत्सवी वर्धापन दिन’नांदेड शहरात- इंजि. अनिल माळगे

यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते यांनी हंगामी वसतीगृहाचा मुद्दा उपस्थित केला. वसतीगृह का सुरु झाले नाही याची विचारणा केली मात्र त्यांना योग्य उत्तर देता आले नाही. तसेच शिष्यवृत्ती वाटपाबाबतत्यांना धारेवर धरले. जिल्हा क्रीडा संकुलना बाबत आमदार बांगर यांनी प्रश्न मांडला. मात्र क्रीडाधिकारी निरुत्तर झाले. पुरजळ २३ गाव पाणी पुरवठा योजनेच्या देयकावरून जिल्हा परिषद सदस्य अंकूश आहेर यांनी विज कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. देयक भरल्यानंतरही विज पुरवठा का सुरु केला नाही याप्रश्नावर आम्ही प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याचे सांगत विज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच जळालेले रोहित्र तातडीने बदलून देण्याच्या सुचना आमदार बांगर यांनी दिल्या. 

कोरोना संदर्भात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने उकृष्ट काम केले. त्यामुळे  रुग्णांची संख्या वाढली नाही . त्यामुळे श्री.  जयवंशी यांच्या कामाचे कौतूक करून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Education, sports complex, solar pump issues were well discussed in the meeting of the planning committee hingoli news