esakal | हिंगोली : दिवाळी झाली तरी कापूस खरेदीचा अद्याप मुहूर्तच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यंदा दसराही झाला अन् दिवाळी सुरू झाली असताना देखील कापुस खरेदी सुरू झाली नसल्याने कापुस उत्पादकांचा हिरमोड झाला आहे . त्याचा फायदा बाजारपेठमधील व्यवसायिक घेत असून ५ हजार जाते रुपय दराने कापुस खरेदी केली जात आहे . 

हिंगोली : दिवाळी झाली तरी कापूस खरेदीचा अद्याप मुहूर्तच नाही

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : दरवर्षी दसरा व दिवाळीच्या शुभमुहुर्तावर फेडरेशनच्या माध्यमातून हिंगोली शहराजवळील औद्योगिक वसाहतीमध्ये कापुस खरेदी केली जाते . यंदा दसराही झाला अन् दिवाळी सुरू झाली असताना देखील कापुस खरेदी सुरू झाली नसल्याने कापुस उत्पादकांचा हिरमोड झाला आहे . त्याचा फायदा बाजारपेठमधील व्यवसायिक घेत असून ५ हजार जाते रुपय दराने कापुस खरेदी केली जात आहे . 

जिल्हाभरात शेतकयांनी कापसाची लागवड केली होती. मध्यंतरी परतीच्या पावसात कापसाचे काही प्रमाणात नुकसान झाले असताना अनेक शेतकऱ्यांनी उरला- सुरला कापुस काढुन घरात आणून ठेवला. दरवर्षी दसरा व दिवाळीच्या शुभमुहुर्तावर कापुस खरेदीचा शुभारंभ  केला जातो.

हेही वाचा नांदेडकरांचा पाडवा गोड : माहूरचे रेणुकादेवी मंदीर भाविकांनी गजबजले, दर्शनाकरिता रांगा -

महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक खाजगी पणन महासंघ मर्यादीत अंतर्गत हिंगोली बाजार समितीच्या  माध्यमातून शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार फेडरेशनकडून लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीच्या  जिनिंग व फॅक्टरीमध्ये दरवर्षी कापुस खरेदी केली  जाते.

गतवर्षी शासनाच्या आधारभूत ५५५० रुपयाच्या ६० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. यंदा दसराही पार पडला तरी देखील कापुस खरेदीचा शुभारंभ झालाच नाही . दिवाळी सुरू झाली असून कापुस खरेदी सुरू करण्यात आली नाही . त्यामुळे कापुस उत्पादकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.अनेक शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने त्यांना नाईलाजास्तव बाजारपेठमध्ये जाऊन खाजगी विक्रेत्यांना कापुस विकावा लागत आहे कापसाला पाच हजाराचा दर मिळत आहे. फेडरेशनकडून ५८५० रुपये दराने कापुस खरेदी होणार आहे. जिल्ह्यात एकमेव फेडरेशनचे केंद्र असुन सुद्धा कापुस खरेदीचा शुभारंभ झालाच नाही .

संपादन - प्रल्हाद कांबळे