हिंगोली : गरिबांची फोडणी महागली का ते वाचा ?

शिरीष जोशी
Friday, 18 September 2020

जागतिक बाजारपेठेमध्ये गेल्या आठवडाभरापासून चिनने मोठ्या प्रमाणात सूर्यफूल तेलाची खरेदी सुरू केल्याने जागतिक पातळीवर सूर्यफुलाच्या दरांमध्ये प्रति किलो २५ ते ३० रुपये वाढ झाली आहे

कनेरगाव नाका (जिल्हा हिंगोली) : सुर्यफुल तेलाची वाटचाल दीडशे रुपये कडे सुरू झाल्याचा परिणाम म्हणून सोयाबीन तेलाने शंभरी पार केली आहे .

जागतिक बाजारपेठेमध्ये गेल्या आठवडाभरापासून चिनने मोठ्या प्रमाणात सूर्यफूल तेलाची खरेदी सुरू केल्याने जागतिक पातळीवर सूर्यफुलाच्या दरांमध्ये प्रति किलो २५ ते ३० रुपये वाढ झाली आहे त्याचा परिणाम म्हणून सर्व भार सोयाबीन तेलावर येत असल्याने सोयाबीन तेलाच्या दरातही पाच ते आठ रुपये किलो ची तेजी आली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात सोयाबीन तेलाने शंभरी पार केली आहे.

सोयाबीन तेलाचे १५ किलोची कॅन १५२५ वरून १६२० रुपयांवर

अकरा सप्टेंबर पर्यंत किरकोळ बाजारांमध्ये १५ किलो सोयाबीन तेलाचा डबा १४७५-८०  रुपयाला मिळत होता तो  गुरुवार पासून ता. १७ रोजी १५५० ते ६० रुपयांवर पोहोचला.तर सोयाबीन तेलाचे १५ किलो ची कॅन १५२५ वरून १६२० रुपयांवर पोहचली आहे. तर ९५ रूपये किलो दराने मिळणारे येणारे तेल हे शंभर ते एकशे दोन रुपये किलो दराप्रमाणे विकले जात आहे.

हेही वाचाइसापुर धरणाचे अकरा दरवाजे उघडले, धरणाखालील गावांना सावधानतेचा इशारा

१५ लिटर सूर्यफूल तेलाची कॅन ही १९०० ते १९५० रुपयापर्यंत

आठवडाभरापूर्वी सूर्यफूल तेलाचे एक लिटर चे पाकीट ११० रुपयापर्यंत मिळत होते ते आता १३५ ते १४० रुपये पर्यंत पोहोचले आहे. तर पंधराशे  ऐंशी ते सोळाशे रुपये पर्यंत मिळणारी १५ लिटर सूर्यफूल तेलाची कॅन ही १९०० ते १९५०  रुपयापर्यंत वधारली आहे. 

सूर्यफूल तेलामध्ये ही प्रचंड प्रमाणात झालेल्या दरवाढ

शेंगदाणा तेलाचे दर हे गेल्या काही दिवसांपासून दीडशे रुपयांच्या वर पोहोचल्या मुळे अनेक ग्राहकांनी सूर्यफूल त्याला पसंती दिलेली होती मात्र आता सूर्यफूल तेलामध्ये ही प्रचंड प्रमाणात झालेल्या दरवाढी मुळे सर्व दबाव सोयाबीन तेलावर येत असल्याने  सोयाबीन तेलाचे दरही वाढून शंभरी पार झाले आहेत.

येथे क्लिक करा - Video- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल अमुल्य- वर्षा गायकवाड

ग्राहकांची सोयाबीन तेलालाच मोठी मागणी

सोयाबीन तेलाच्या दराच्या पेक्षा शेंगदाणा तेल व सूर्यफूल तेल या दोन्ही तेलांच्या दरांमध्ये  मोठा फरक व पावसामुळे व थंडीमुळे थिजत असलेले पामतेल यामुळे ग्राहकांची सोयाबीन तेलालाच मोठी मागणी आहे. त्याचाच परिणाम म्हणून भाव वाढ झाल्याचे बोलले जाते . तसेच सूर्यफूल तेलामध्ये झालेले मोठी भाववाढ यामुळे सूर्यफूल तेलामध्ये सोयाबीन तेलची भेसळ केली जाणाच्याची शक्यता असल्याने सोयाबीन तेलामध्ये तेजी आल्याचे जाणकार सांगतात.

असे आहेत दर 

आज किरकोळ बाजारांमध्ये तेलाचे दर पुढीलप्रमाणे होते कंसामध्ये आठवडापूर्वीचे दर दिले आहेत एक लिटर सोयाबीन तेल १०० ते १०२ रुपये (९५ रुपये) दोनलिटर तेलाची कॅन दोनशे पंधरा ते दोनशे वीस रुपये(२००-२०५ रुपये) ५ लिटर तेल कॅन ५१० रूपये (४९० रुपये ) १५ किलो डब्बा १५५०-६० रूपये (१४७५-८० रुपये )१५ किलोची कॅन १६३०-४० रूपये (१५५०-६० रुपये) मिळत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Expensive for the poor, hingoli news

Tags
टॉपिकस
Topic Tags: