
याबाबत माहिती अशी कि, कळमनुरी तालुक्यातील कस्बेधावंडा येथील शेतकरी सचिन मिराशे वय २८ हे त्यांच्या स्वतः च्या शेतात ट्ँक्टरच्या सहाय्याने रब्बी हंगामातील पेरणीसाठी मशागत करीत होते. आज सकाळी आठ वाजता ते शेतात गेले होते.
हिंगोली : शेतात ट्रँक्टरने पेरणीसाठी मशागत करीत असताना जमीन समान असलेल्या विहिरीचा अंदाज आला नसल्याने ट्रँक्टर विहिरीत पडून शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता. १० ) सकाळी नऊ वाजता कळमनुरी तालुक्यातील कस्बेधावंडा येथे घडली.
याबाबत माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील कस्बेधावंडा येथील शेतकरी सचिन मिराशे (वय २८) हे त्यांच्या स्वतः च्या शेतात ट्ँक्टरच्या सहाय्याने रब्बी हंगामातील पेरणीसाठी मशागत करीत होते. सकाळी आठ वाजता ते शेतात गेले होते.
मशागत करीत असताना त्यांच्या शेतात जमीन लेवल असलेली विहीर त्यांच्या लक्षात आली नसल्याने ते टँक्टरसह विहिरीत पडले विहिरीत भरपूर पाणी असल्याने ते खोलवर गेले या त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - हिंगोलीतील घरकुल लाभार्थ्यांची दिवाळी होणार गोड -
ही घटना शेजारच्या शेतकऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच ही माहिती त्यांच्या घरी कळविली. नंतर घटनास्थळी त्यांच्या कुटुंबीयासह गावकरी धावले. विहिरीत पडलेले टँक्टर बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणली त्यानंतर टँक्टर विहिरीच्या बाहेर काढले. त्यानंतर विद्युत मोटार लावुन विहिरीतील पाणी बाहेर काढल्यावर सचिन मिराशे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान सचिन मिराशे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे