esakal | हिंगोली : शेतकर्‍यांची चळवळ उभी राहणे गरजेचे, गिरगाव येथे केळी परीषदेत शेतकऱ्यांचे मत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खंडोजी माळवटकर  तर प्रमुख वक्ते म्हणून डोगरकडा येथील प्रगतशील शेतकरी बेगडराव गावडे, मालेगावचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांची उपस्थिती होती. यावेळी  विविध विषयांवर चर्चा झाली

हिंगोली : शेतकर्‍यांची चळवळ उभी राहणे गरजेचे, गिरगाव येथे केळी परीषदेत शेतकऱ्यांचे मत

sakal_logo
By
प्रभाकर बारसे

गिरगाव ( जिल्हा हिंगोली ) : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात रविवार (ता. २२)  केळी परिषद संपन्न झाली असून यात शेतकर्‍यांची चळवळ उभी राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करुन विविध ठराव घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खंडोजी माळवटकर तर प्रमुख वक्ते म्हणून डोंगरकडा येथील प्रगतशील शेतकरी बेगडराव गावंडे, मालेगावचे प्रल्हाद इंगोले यांची उपस्थिती होती. यावेळी  विविध विषयांवर चर्चा झाली. केळी बाबत चर्चा करताना सोलापुर, जळगाव येथे जास्त भाव मिळतो, मात्र हिंगोली जिल्ह्यातील केळीला भाव कमी मिळत आहे. शेतातून केळीच्या झाडाची वाहतूक करण्यासाठी विस ते पंचवीस रुपये खर्च येतो तसेच  केळीची पट्टी लवकर मिळत नसल्याने शेतकर्‍यांची आर्थिक लुट होत आहे. या  विषयांवर चर्चा झाली. हे थांबविण्यात यावे केळी उत्पादकाचा लाभ होईल याचा विचार व्हावा या व इतर विषया संदर्भात ठराव मंजूर करण्यात आले. 

हेही वाचा  हिंगोली : घंटागाडी चालक शंकर शिंदे यांचा सत्कार, गणेश गृहनिर्माण संस्थेचा पुढाकार 

या संदर्भात जिल्हाधिकारी सहायक निबंधक, बाजार समिती यांना निवेदन देऊन शेतकर्‍यांची होणार्‍या लुट त्वरित थांबवावी असे अनेक मुद्दे मांडण्यात आले. यामध्ये बेगडराव गावडे, प्रल्हाद इंगोले, प्रयाग अडकिणे, विजय नरवाडे, किरण देशमुख, रावसाहेब अडकिणे, रवींद्र नादरे,  देविदास कर्हाळे, अशोक कर्हाळे आदींनी मार्गदर्शन केले. या परीषद मध्ये डोगरकडा, अर्धापुर, बारड, मालेगाव, कुंरूदा, पार्डी बु,  परजना, खाजमापुर वाडी आदी गावातील शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी बालाजी यशवंते संभाजी बेले, अवधूत अंबेगावकर, हनुमंत राजेगोरे शंकरराव कर्हाळे, जिल्हा परिषद सदस्य विलासराव रायवाडे, पंचायत समिती विलासराव नादरे, अरुण पाटील, शंकरभाई कर्हाळे, गंगाधर नादरे, प्रभाकर माळेवार, धोडीराम कल्याणकर,  शिवप्रसाद रायवाडे,  गजानन रायवाडे, यांच्या सह गावातील शेतकरी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद नादरे यांनी केले.

संपादन - प्रल्हाद कांबळे