हिंगोली : घंटागाडी चालक शंकर शिंदे यांचा सत्कार, गणेश गृहनिर्माण संस्थेचा पुढाकार 

file photo
file photo

हिंगोली :  शहरालगत असलेल्या  बळसोंड परिसरातील घंटा गाडीद्वारे कचरा संकलन करणारे चालक शंकर शिंदे यांचा रविवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता गणेश गृहनिर्माण संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, कपडे देऊन सत्कार सेवानिवृत्त नायब तहसीलदार मारोतराव मुकाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

बळसोंड परिसरात  घरगुती कचरा संकलन करण्यासाठी बळसोंड ग्रामपंचायत  वतीने कचरा संकलन करण्यासाठी कुठलीही सुविधा नसल्याने सर्वत्र घाण साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले होते. त्यामुळे नगर पालिकेच्या धर्तीवर घरगुती कचरा संकलन करण्यासाठी पप्पू चव्हाण यांनी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे पाहून कचरा संकलन करून परिसर स्वच्छ ठेवणे काळाची गरज ओळखून त्यांनी पप्पू चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने बळसोंड परिसरातील सर्व वसाहतीत घंटा गाडीच्या माध्यमातून ओला व सुका कचरा दररोज संकलन केल्या जातो. गेली आठ महिन्यापासून हा उपक्रम सुरू आहे.गाडीचे डिझेल व चालकाचा खर्च देखील ग्रामपंचायत कडून न घेता स्वतः देत आहेत.

एकीकडे जिल्हा परिषद ग्रामपंचायतीना स्वछ भारत मिशन अंतर्गत  परिसराची स्वछता राखण्याचे आदेश देते,परंतू आजघडीला बळसोंड  परिसरात अनेक ठिकाणी नाल्या नसल्याने घाण पाणी रस्त्यावर येते परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडते. त्यानुसार पप्पू चव्हाण यांनी ग्रामपंचायत परिसरात स्वछता राहावी व नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी स्वखर्चातून त्यांनी मागील आठ महिन्यापासून घंटा गाडीच्या माध्यमातून कचरा संकलन करण्याचे काम आजही अविरत सुरु आहे. लॉकडाऊन काळात ही घरोघरी गाडी नेऊन कचरा संकलनाचे काम चालक शंकर शिंदे यांनी केले. त्यामुळे रविवारी  प्रामाणिक पणे सेवा बजावल्या बद्दल अंतुलेनगर येथील हनुमान मंदिरात आहेर देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी गणेश गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष मारोतराव मुकाडे, कोशाध्यक्ष जी. के. येवले, सचिव सदाशिव दळवे, संचालक रमेश पवार, कुंडलीकराव देशमुख, जी. जी. टोंचर, विश्वनाथ टेकाळे, एल. के. सारस्वत, डी. आर. बांगर, पी. जी. खंदारे, एच. एल. सावंत, पुंजाराव नायक प्रकाश पाटील, रामराव गायकवाड, रामू गायकवाड, माधव जाधव, सुनील येवलेकर,पत्रकार विलास जोशी, सुमेध घिके, संतोष राऊत, विनोद कुलकर्णी, रमेश रामपूरकर, त्र्यंबकराव तावरे, डी. आर. पतंगे, एस. के. मानमोटे , गणेश शृंगारे आदीं उपस्थित होते.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com