
सेनगाव तालुक्यातील सापडगांव येथे गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सेनगाव (जिल्हा हिंगोली) : तालुक्यातील सापडगांव येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून जवळपास दोन लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (ता. २४) मध्यरात्री घडली. यामध्ये एक शेळी दगावली असून शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
सेनगाव तालुक्यातील सापडगांव येथे गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. येथील हिमतराव अवचार यांचे गावाच्या बाहेर शेतीला लागून राहते घर आहे. आणि त्यांच्या घरासमोरच गुरा वासरांचा व शेतीचे साहित्य ठेवण्यासाठी गोठा आहे. गुरुवारी रात्री हिमतराव अवचार हे शेतात पिकांना पाणी द्यायला गेले होते. घरी त्यांची पत्नी व मुलगा एकटेच होते. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अचानक या गोठ्याला आग लागली. त्यामध्ये १५ हजार रुपये कीमतीची शेळी जागीच दगावली. तर या गोठ्यातील शेती विषयक साहित्य. व ३० ते ४० टिनपत्रे जळून झाली आहेत. असे एकूण जवळपास दोन लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या गोठ्यामध्ये एक म्हैस व तिचं बछडं सुध्दा होतं. त्या बछड्या आगीची आस लागली. परंतु सुदैवाने दोन्हीही जनावरे सुखरूप गोठ्याच्या बाहेर पडली.
हेही वाचा - नांदेड : अर्धापूरातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांची स्वच्छता; ऐतिहासिक वारसा जोपासण्याचा केला संकल्प -
मात्र या आगीत एक शेळी व शेती विषयक साहित्य जळून खाक झाल्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासन सध्या ग्रामपंचायत निवडणुकित व्यस्त असल्यामुळे प्रशासनाला दुपारी १२ वाजतापर्यंत सदरील घटनेबाबत कुठलीही माहिती नव्हती. या शेतकऱ्याने संबंधित तलाठ्याला संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली. प्रशासनाने या गंभीर घटनेचा तपास करून या शेतकऱ्याला आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.
रात्री शेतात गहु, हरबरा पिकांना पाणी द्यायला गेलो होतो. सकाळी घरी परतल्यानंतर मला कळाले की गोठ्याला आग लागली. यात एक शेळी दगावली व गोठ्यात असणारे शेती उपयोगी साहित्य जळून खाक होऊन जवळपास दोन लाख रूपयांचे नुकसान झाले. तरी प्रशासनाने मला नुकसान भरपाई द्यावी.
- हिमतराव अवचार शेतकरी (सापडगांव)
संपादन - प्रल्हाद कांबळे