हिंगोली : कुरुंदा परिसरात सर्वेक्षण सुरु ;पुरग्रस्तांच्या खात्यात पाच हजाराची मदत

कुरुंदा व परिसरात पुरामुळे मोठे नुकसान झाले.
 hingoli
hingolisakal
Updated on

कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरुंदा व परिसरातील पुरग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी तहसील प्रशासनाने नियोजन करून रविवारी ता. १० महसुल, कृषी व पंचायत विभागाच्या ५० जणांच्या पथकाकडून सर्वेक्षण सुरु केले आहे. १९६ पुरग्रस्तांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप करण्यात आले असून उर्वरीत कुटुंबाला मदत देण्यासाठी मुंबई येथून राष्ट्रीयकृत बँक सुरु करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत.

कुरुंदा व परिसरात पुरामुळे मोठे नुकसान झाले. अनेक कुटुंब उघड्यावर आले असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने , उपविभागीय अधिकारी डॉ . सचिन खल्लाळ , तहसीलदार अरविंद बोळंगे गावात ठाण मांडून बसले आहेत. कुरुंदा येथील गावकऱ्यांना तीन स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वाटप सुरु करण्यात आले आहे.

तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने भोजन वाटप केले जात आहे. १९६ कुटुंबाला प्रत्येकी पाच हजार रुपये व धान्याचे किट देण्यात आले आहे. उर्वरीत लाभार्थ्याच्या बँक खात्यात आर्थिक मदत देण्यासाठी उपविभागीय अधिकारी खल्लाळ , तहसीलदार बोळंगे यांनी कोषागार विभागाच्या वरिष्ठ विभागाकडून कार्यालय सुरु करून देयके मंजूर करणे व सदर रक्कम मुंबई येथील राष्ट्रीयकृत बँकेकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी बँक सुरु करण्याचे प्रयत्न केले आहेत.

जिल्हाधिकारी पापळकर देखील लक्ष ठेवून आहेत.रविवारी सुट्टीच्या दिवशीही ५० कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहे. यामध्ये गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, मंडळाधीकारी पाच,तलाठी २८, ग्रामसेवक ११ व इतर कर्मचारी असे ५० जणांचे पथक प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन नुकसानीची माहिती घेत आहेत. प्रशासनाकडून तातडीने उपाय योजना हाती घेण्यात आल्याने पुरग्रस्तांना दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या नियोजनावर पुरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathwada Rain Waiting
Maharashtra Earthquake
Senior Congress Leader Shriram Patil Rajurkar Passes Away
Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
Marathi News Esakal
www.esakal.com