हिंगोली : जिल्ह्यात साडेचार हजार गर्भवती मातांनी घेतला मातृवंदना योजनेचा लाभ

राजेश दारव्हेकर
Friday, 4 December 2020

जिल्ह्यात केंद्रशासनाकडून प्रधानमंत्री मातृवंदना मागील चार वर्षांपासून राबविली जाते. या योजनेचे वैशिट्य म्हणजे गर्भवती मातेला सकस व पोषण आहार मिळावा तसेच जन्म मृत्यू मध्ये होणारी घट रोखण्यासाठी मुख्य उद्देश आहे.

हिंगोली-  जिल्ह्यात मागील नऊ महिन्यात चार हजार सहाशे ३७ नोंदणी केलेल्या गर्भवती मातेने प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.

जिल्ह्यात केंद्रशासनाकडून प्रधानमंत्री मातृवंदना मागील चार वर्षांपासून राबविली जाते. या योजनेचे वैशिट्य म्हणजे गर्भवती मातेला सकस व पोषण आहार मिळावा तसेच जन्म मृत्यू मध्ये होणारी घट रोखण्यासाठी मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा -  भोकरचे नागनाथ घिसेवाड यांचा भाजपला जय श्रीराम, काॅंग्रेस पक्षात प्रवेश -

कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव पाहता मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात देखील ही योजना सामाजिक अंतर राखत सुरु होती. दरम्यान ,मार्च ते नोव्हेंबर या नऊ महिन्याच्या काळात चार हजार ६३७ प्रथम खेपेच्या गर्भवती मातांना पाच हजार रुपये शासनाकडून  तीन टप्य्यात दिले जातात. त्यानुसार  पहिल्या टप्यात गर्भवती असताना एक हजार ,दुसऱ्या टप्यात सहा महिने लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार, तर तिसऱ्या टप्यात बाळाच्या जन्मानंतर तीन महिन्याचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार असे एकूण पाच हजार रुपये शासनामार्फत मातेच्या आधार संलग्न बँक खात्यात वर्ग केले जातात असे डॉ. पवार यांनी सांगितले. नऊ महिन्यात नोव्हेंबर अखेर दोन कोटी ,३१ लाख ,८५ हजार रुपयांचे वाटप झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Four and a half thousand pregnant mothers in the district took advantage of Matruvandana Yojana hingoli news