
२३ दुचाकीसह चार चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. चोरट्यांकडून हिंगोली, परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुचाकी चोरलेल्या जप्त केल्या असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी ( ता. २४ ) सांगितले.
हिंगोली : मागील वर्षात चोरीस गेलेल्या दुचाकीचा तपास सुरु केला असता बुधवारी (ता. २३) २३ दुचाकीसह चार चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. चोरट्यांकडून हिंगोली, परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुचाकी चोरलेल्या जप्त केल्या असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी ( ता. २४ ) सांगितले.
जिल्ह्यात मागील वर्षी विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. वसमत येथून सात, हट्टा एक, कुरुंदा एक, वसमत चौदा अशा २३ दुचाकी चोरी गेल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली आणि विशेष मोहीम हाती घेत वसमत हद्दीत खबऱ्याकडून माहिती घेतली. दुचाकी चोरी करणाऱ्या तसेच विकत घेणाऱ्यांची माहिती काढून चोरटा शेख मूर्तुझा शेख मन्नान, उमेरखा उर्फ हाजी बिस्मिलाखान, शेख अझर शेख दिल्लू, आखाडा बाळापूर यासह त्यांच्या दोन साथीदारांना ताब्यात घएतले. त्यांनी वसमत व आखाडा बाळापूर येथे चोरीच्या दुचाकी विक्री केल्याचे सांगितले. एवढएच नाही तर त्यांच्या ताब्यातून हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, परभणी जिल्ह्यातील चोरी केलेल्या दुचाकी जप्त केल्या.
हेही वाचा - आमदार रत्नाकर गुट्टेना ईडीचा झटका, अडीचशे कोटींची मालमत्ता जप्त, परभणी जिल्ह्यात खळबळ -
तसेच आरोपीना विश्वासात घेऊन वसमत शहर, बाळापूर येथे दुचाकींचे कागदपत्रे नंतर देतो असे खोटे सांगून विक्री केलेल्या व्यक्तींकडून जप्त करण्यात आल्या. अधिक विचारपूस केली असता कुरुंदा, जवळा बाजार, बाळापूर, भोकर, औरंगाबाद, येथून दुचाकी चोरी करुन विक्री केल्याचे चौकशीत उघड झाले. आरोपीने एकूण २३ दुचाकी असून त्या दुचाकींची किंमत अंदाजे १५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच वसमत पोलिसांना हुलकावण्या देणारा व मागील पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपी निहाल उर्फ बंगा बालाजी डोईजड राहणार वसमत यास ताब्यात घेतले आहे.
पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. एस. घेवारे, संभाजी लेकुळे, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत यांच्या पथकाने कामगिरी बजावली आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे