हिंगोली : तीन लाखाच्या गुटख्यासह १३ लाखाचा मुद्देमाल जप्त- स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही 

राजेश दारव्हेकर
Sunday, 13 December 2020

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार हिंगोली ते सेनगाव मार्गावर  एक काळसर राखाडी रंगाची मारोती सुझुकी कंपनिची इरटिगा व्हि.डी आय कार कमांक एमएच ३७ व्हि . ४७२३ या मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा सेनगाव कडून हिंगोलीकडे घेउन येत आहे

हिंगोली : हिंगोली ते सेनगाव मार्गे  गस्त घालीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन लाख रुपये किमंतीचा गुटखा एक इरटिगा कारसह १३ लाखाचा मुद्देमाल रविवारी (ता.१३) जप्त केला आहे. यावेळी पोलिसांनी दोघांना अटक केले आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार हिंगोली ते सेनगाव मार्गावर एक काळसर राखाडी रंगाची मारोती सुझुकी कंपनिची इरटिगा व्हि.डी आय कार कमांक (एमएच ३७ व्हि . ४७२३) या मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा सेनगाव कडून हिंगोलीकडे घेउन येत आहे अशी खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक  एस. एस. वारे यांना मिळाली. त्यानंतर पथकाने स्टॉफ यांनी राहुली फाटा येथे थांबुन येणाऱ्या सदर वर्णनाच्या इरटिगा कार थांबविली कारमध्ये मागाच्या बाजुस पांढऱ्या रंगाचे एकावर एक रचलेले पोते दिसून आले. आरोग्यास हानीकारक महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेल्या गुटख्याचे एकूण १६ पोते मिळून आले. आतील पोत्यांची पाहणी केली असता त्यात गोवा १०००, राजनिवास पानमसाला कंपनीचा सुगंधीत पानमसाला गुटखा व पोते मिळून आले. सदर कारचे चालक गोपाल रंजवे व त्याचे सोबत असलेला विनोद रंजवे, दोघे रा.भोकरखेड (ता.रिसोड जि.वाशिम) यांना विचारले असता त्यांनी सदरचा गुटखा हा चोरटया मार्गाने विक्री करण्यासाठी हिंगोलीकडे नेत असल्याचे सांगितले. 

हेही वाचा -  हिंगोलीत भिसे, चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढली- आमदार मेघना बोर्डीकर 

सदर वाहनामधील महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गोवा १०००, राजनिवास पानमसाला कंपनीचे सुगंधीत तंबाखुच्या १६ पोते एकूण किंमती ३ लाख १७ हजार २८०  रूपये व इरटिगा व्हिडीआय कार किंमती दहा लाख रुपये किंमंत असा एकूण १३ लाख १७ हजार २८० रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने दोघाविरुद्ध हिंगोली ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती. 

पोलिस निरीक्षक यु. ए. खंडेराय यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, विलास सोनवणे, शंकर जाधव, रेश्मा शेख, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, दिपक पाटील, आकाश टापरे, रविना घुमनर यांच्या पथकाने केली आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Gutka worth Rs 3 lakh, property worth Rs 13 lakh seized along with car - action taken by local crime branch nanded news