esakal | Hingoli:अतिवृष्टीचा पालकमंत्र्यांनी घेतला व्हीसीद्वारे आढावा
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टीचा पालकमंत्र्यांनी घेतला व्हीसीद्वारे आढावा

हिंगोली :अतिवृष्टीचा पालकमंत्र्यांनी घेतला व्हीसीद्वारे आढावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात सोमवार व मंगळवारी या दोन दिवसात मुसळधार पावसाने नद्या,ओढे दुथडी भरून वाहत आहेत ,धरणातील पाण्याचा विसर्ग ही नदीपात्रात सोडल्याने नदीककाठच्या शेतात पाणी शिरले यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत बुधवारी ता. २९ पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीचा ऑनलाइन प्रणालीद्वारे आढावा घेत संवाद साधला.यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जीपचे सीईओ संजय दैने, वीज वितरण कार्यकारी अभियंता ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, पंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यात सोमवार, मंगळवारी या दोन दिवसात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान यामध्ये जमिनीचे नुकसान, पिकांचे नुकसान, रस्ते, पूल, शासकीय इमारतीची पडझड, पंचनाम्याची सद्यस्थिती, तलावाची सद्यस्थिती ,वीज वितरण झालेले नुकसान, पुरात वाहून गेलेल्या व्यक्ती, जनावरांची माहिती,घरांची झालेली पडझड, संपर्क तुटलेली गावे, पुराने वेढलेली गावे आदी विषयावर आढावा घेण्यात आला.

हेही वाचा: इंदापूर नगरपरिषदेमार्फत कचरा अलग करो अमृतमहोत्सव : अंकिता शहा

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संवाद साधताना म्हणाले , २७ व २८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीत दोन लाख चार हजार २२४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे सांगून जून ते आजतागायत दोन लाख तेरा हजार २७७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे सांगितले.या दोन दिवसांच्या कालावधीत एकाही व्यक्तीचा मृत्यू नसून, एक जनावर पुरात वाहून गेल्याची माहिती दिली. तसेच जून २१ ते आजतागायत १५ व्यक्तीचा मृत्यू झाला असून , ३८ जनावरे दगावली असल्याचे सांगितले.

याशिवाय पूल, रस्ते, शासकीय इमारतीच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली.यावर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रशासनासी बोलताना म्हणाल्या ,नुकसानग्रस्त शेत जमिनीचे तातडीने पंचनामे करून आजतागायत किती जनावरे दगावली त्याची नुकसानभरपाई साठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्याचे सांगून पूल, रस्ते ,शासकीय इमारतीचे झालेले नुकसानीचा अहवाल तयार करून त्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना आढावा बैठकीत दिल्या.

loading image
go to top