esakal | Pune: इंदापूर नगरपरिषदेमार्फत कचरा अलग करो अमृतमहोत्सव : अंकिता शहा
sakal

बोलून बातमी शोधा

अमृतमहोत्सव

इंदापूर नगरपरिषदेमार्फत कचरा अलग करो अमृतमहोत्सव : अंकिता शहा

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेमार्फत शहरात आझादी का अमृतमहोत्सव उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी कचरा वर्गीकृत करणाऱ्या नागरिकांचा नगर परिषदेमार्फत तुळशीचे रोप, सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन नगराध्यक्षा सौ. शहा व मुख्याधिकारी श्री. कापरे यांच्या हस्तेसन्मान करण्यात आला,घंटागाडी कर्मचाऱ्यांना कचरा वर्गीकरण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी नगरपरिषदेने घंटागाडी ड्रायव्हर व हेल्पर यांचा सन्मान केला.

यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या, या उपक्रमाअंतर्गत दि. ३० सप्टेंबर रोजी सार्वजनिक शौचालय साफ सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान तसेच प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नागरिकांना व कर्मचाऱ्यांना टॉयलेट बाबत प्रतिक्रिया प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. दि. १ ऑक्टोबर रोजी शहा संस्कृतिक भवन येथे शहरातील सामाजिक, सांस्कृतिक संघटना,गणेश मित्रमंडळ,पत्रकार बांधव, इतर संघटनांचा नगरपरिषदेच्या वतीने शहर स्वच्छतेमध्ये दिलेल्यायोगदानाबद्दलसत्कार करण्यात येणार आहे. दि.२ ऑक्टोबररोजी सफाई मित्र अमृत सम्मान समारोह अंतर्गत नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता व वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. सर्व सफाई मित्रांना सुरक्षा साहित्य देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शहरातील नागरिक व महिला भगिनींनी कचरा वर्गीकरण करून शहर हरित ,स्वच्छ, सुंदर ठेवण्यास हातभार लावावा असे आवाहन नगराध्यक्षा सौ. शहा यांनी केले.

हेही वाचा: दोडामार्ग : वाहतूक दरवाढीबाबत डंपर चालक मालक संघटनेची बैठक

मुख्याधिकारी रामराजे कापरे म्हणाले, हे शहर आपले आहे या भावनेतून नागरिकांनी या अभियानात उस्फुर्त योगदान देवूनशहराचा नावलौकिक उंचवावा.

यावेळी इंदापूर तालुका शिक्षण मंडळाचेसचिव मुकुंद शहा, आरोग्य सभापती अनिकेत वाघ ,सभा अधीक्षक गजानन पुंडे,स्वच्छ सर्वेक्षण व वसुंधरा अभियान नोडलऑफिसरगोरक्षनाथ वायाळ, नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सक्रिय भाग घेतला.

loading image
go to top