esakal | हिंगोलीला कोरोनाचा धक्का : गुरुवारी रात्री ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, संख्या पोहचली ५०६ वर 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

४३ रुग्ण सापडले अँटीजन टेस्ट मध्ये ,१३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर

हिंगोलीला कोरोनाचा धक्का : गुरुवारी रात्री ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, संख्या पोहचली ५०६ वर 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून गुरुवारी (ता. २३) रात्री उशिराने प्राप्त अहवालानुसार शहरातील पाच कंटेनमेन्ट झोनमध्ये गुरुवारी अँटीजेन रॅपीड टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये ४३ रुग्ण सापडले असून एकाच दिवशी ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर १३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.

शहरात ज्या भागात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तो परिसर सील करून कंटेनमेन्ट घोषित केला जातो. सध्या शहरात पाच कंटेनमेन्ट झोन असून यात तोफखाना कंटेनमेन्ट झोन मध्ये १२१ नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी १०९ लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १२ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. मंगळवारा झोनमध्ये एकूण ९५ नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ८५ अहवाल निगेटिव्ह तर १० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तलाबकट्टा झोनमध्ये ९९ व्यक्तीची तपासणी केली असता ९५ अहवाल निगेटिव्ह तर चार अहवाल पॉझिटिव्ह, याचप्रमाणे आझम कॉलनी येथे ९४ जणांची अँटीजेन तपासणी केली असता ८२ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. तसेच पेन्शनपुरा झोनमध्ये ९७ जणांची तपासणी करण्यात आली त्यापैकी ९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर पाच जण पॉझिटिव्ह सापडले. आज दिवसभरात पाचही झोनमध्ये एकूण ५०६ जणांची अँटीजन टेस्ट केली असता ४६३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर ४३ जणांचे टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

हेही वाचा -  कोरोनाचा धिंगाना सुरुच : गुरुवारी ५६ बाधित, तर पाच जणांचा मृत्यू, ३६ रुग्ण बरे, संख्या ११३० वर पोहचली

गावपातळीवर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत

या व्यतिरिक्त उर्वरित गावपातळीवर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या पैकी जवळा बाजार एक ६९ वर्षीय पुरुष, आखाडा बाळापूर एक ६७ वर्षीय पुरुष, झमझम कॉलनी कळमनुरी येथे एक रुग्ण ५४ वर्षीय पुरुष तसेच कळमनुरी तालुक्यातील हरवाडी येथे दोन रुग्ण असून एक २९ वर्षीय युवक व ३० वर्षीय युवती तर कांडली येथे एक रुग्ण असून ८० वर्षाची स्त्री आहे. हिंगोली शहरातील आझम कॉलनी येथील बारा रुग्ण असून यात ३५, ३८, ५५, ३८, ६०, ४८ वर्षीय पुरुष तर ३२, २०, ३५, २५, ४८,२७ वर्षीय स्त्री यांचा समावेश आहे. गंगानगर एका पाच वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. गाडीपुरा एक ३७ वर्षीय पुरुष, जिल्हा परिषद वसाहतीत चार यात ३५ वर्षीय पुरुष, २५ स्त्री, सहा व तीन वर्षाच्या मुलांचा समावेश आहे.

या भागातील आहेत बाधीत रुग्ण

याशिवाय वंजारवाडा येथे सहा रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये २४, ४५, ५०, ६०, ३० वर्षीय पुरुष तर एका ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. मंगळवारा येथे ३१, २३ वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. तर अकोला बायपास येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत यामध्ये २६, २५ वर्षीय पुरुष आहेत. रिसाला बाजार येथे ३१ वर्षीय पुरुष आहे. गवळीपुरा येथे चार जण असून यात ६०, ५०, २० वर्षीय पुरुष तर एका ७० वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. नाईकनगर येथे ४२ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथे २४ वर्षीय पुरुष तर तोफखाना येथे बारा जण आढळून आले आहेत. ४५, २०, २७, २०, ५२, ३४ वर्षीय पुरुष ४८, ६७, ३५ वर्षीय महिला तर ६, ११ वर्षाचे मुलं, एक आठ वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे. आज सात रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये वसमत कोरोना सेंटर येथील सहा तर एक जिल्हा रुग्णालयातील आहे. आतापर्यन्त जिल्ह्यात कोरोनाचे ५०६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३३४ रुग्ण बरे झाल्याने घरी परतले आहेत. आजघडीला एकूण १६७ रुग्णावर उपचार सुरु आहेत. पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

येथे क्लिक करा - लाॅकडाउन : खते व किटकनाशक खरेदीसाठी या बँकेचा आधार

१३ जणांची प्रकृती गंभीर

जिल्हानंतर्गत आयसोलेशन वॉर्ड सर्व कोरोना सेंटर व गाव पातळीवर तयार कारण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर अंतर्गत एकूण ६८७८ जणांना भरती    करण्यात आले होते. त्यापैकी ६०६३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ६०६४ जणांना सुट्टी देण्यात आली. सद्यस्थितीला ७८१ रुग्ण भरती असून, आजरोजी ३१४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आलेल्या रुग्णापैकी १३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे