esakal | हिंगोली : जिल्ह्यात ३५ हजार नागरिक होम क्वाँरंटाईनमध्ये, १२ हजार घरांना लावले रेड शिक्के
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून गावोगावी संशयीताची शोधमोहीम राबवून त्यांना होम ववॉरंटाईन केले जाते . शिवाय परजिल्ह्यातून आलेल्याना होम क्वॉरंटाईन करण्यात येते . सध्या मात्र परजिल्ह्यातून येणाऱ्यांच्या नोंदीच बंद आहेत .

हिंगोली : जिल्ह्यात ३५ हजार नागरिक होम क्वाँरंटाईनमध्ये, १२ हजार घरांना लावले रेड शिक्के

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे संकट शमले असल्याचे चित्र रोजच्या अहवालावरून दिसून येत आहे.मात्र चाचण्यांची संख्या कमी झाल्यानेच कोरोनाचे रूग्ण घटत असल्याचे दिसते. जिल्ह्यात अद्यापही ३५ हजार १९५ नागरिकांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून गावोगावी संशयीताची शोधमोहीम राबवून त्यांना होम ववॉरंटाईन केले जाते. शिवाय परजिल्ह्यातून आलेल्याना होम क्वॉरंटाईन करण्यात येते. सध्या मात्र परजिल्ह्यातून येणाऱ्यांच्या नोंदीच बंद आहेत.

दोन हजार २१८ घरांवर रेड शिक्के

त्यामुळे इतर जिल्ह्यातून कोण कुठे येत आहे याची माहिती कोणालाच लागत नसल्याचे दिसते. जिल्ह्यात होम क्वॉरंटाईन ठेवण्यात आलेल्या व्यक्तीपैकी औंढा नागनाथ तालुक्यातील तीन हजार ९४५ नागरिकांचा समावेश आहे. या तालुक्यात एक हजार ४३८ घरांना होम क्वॉरंटाईन केले असून या घरांवर रेड शिक्के मारण्यात आले आहेत. वसमत तालुक्यात सहा हजार १८४ जण होम ववॉरंटाईनमध्ये आहेत तर दोन हजार ८९३ घरांबर रेड शिक्के मारले आहेत. हिंगोली तालुक्यातील ११ हजार ९० नागरीक होम क्वॉरंटाईनमध्ये तर दोन हजार २१८ घरांवर रेड शिक्के मारण्यात आले आहेत.

हेही वाचाहिंगोलीत दसरा महोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने 

या तालुक्यातील आकडे बोलतात

कळमनुरी तालुक्यात सात हजार ६४९ होम क्वॉरंटाईनमध्ये तर दोन हजार ८५९ घरांवर रेड शिक्के मारण्यात आले आहेत. सेनगाव तालुक्यातील सहा हजार ३२७ होम क्वॉरंटाईनमध्ये तर दोन हजार ७६२ घरांवर रेड शिक्के मारण्यात आले आहेत. होम ववॉरंटाईनमध्ये असलेल्या २७९ जणांना रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात केवळ १३ जणांच्या परजिल्ह्यातून आलेल्यांच्या नोंद घेण्यात आल्या आहेत. शेवटची नोंद एक व पाच ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. त्यानंतर एकाही व्यक्तीची नोंद आरोग्य विभागाने केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे