esakal | हिंगोली : स्वच्छ सर्व्हेक्षणाची पूर्वतयारी करण्याचे बिडीओना निर्देश 

बोलून बातमी शोधा

file photo}

जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोन्द्रे यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.

marathwada
हिंगोली : स्वच्छ सर्व्हेक्षणाची पूर्वतयारी करण्याचे बिडीओना निर्देश 
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २०२१ अंतर्गत जिल्ह्यात पूर्व तयारी म्हणून स्वच्छ सर्व्हेक्षण सुरु होत आहे. त्यानुसार पंचायत समितीने ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करून त्यांची अमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोन्द्रे यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत टप्पा दोन अंतर्गत २०२०-२१ या वर्षात राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छ सर्व्हेक्षणाला सुरुवात होणार असल्याचे केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने जिल्हा परिषदेला काळविले आहे. त्यानुसार सार्वजनिक आणि संस्थात्मक जागेवरील स्वच्छता, नागरिकांचा प्रतिसाद, विविध घटकांची प्रगती या बाबींचा विचार केला जाणार आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार ,धनवंतकुमार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वछता व पाणी कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोन्द्रे यांच्यासह कक्षातील सर्व कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत. 

एलओबी (पायाभूत सर्व्हेक्षणातील कुटुंब व एनएलओबी (नवीन वाढीव घटक) अंतर्गत कामाचा पाठपुरावा, प्रोत्साहन अनुदान वाटप, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापण ,सार्वजनिक 

शौचालय बांधकाम, वैयक्तिक नळ जोडणी, याबाबत वेगवेगळ्या स्तरावरील अधिकारी, कर्मचारी गावपातळीवर जाऊन भेटी देत आहेत. त्यामुळे पूर्वतयारी म्हणून गटविकास अधिकारी यांनी देखील ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी दत्तक दिलेल्या गावात जाऊननागरिकांना स्वच्छते बाबत मार्गदर्शन करावे अशा सूचना दिल्या आहेत. गावात ज्या ठिकाणी सांडपाणी वाहत आहे. अथवा कचरा जमा होत आहे, त्यावर उपाय योजना करून सांडपाणी, घनकचरा आराखड्यात आहेत किंवा नाही याची तपासणी करून ग्रामसेवकाना निर्देश द्यावेत.दोन शोषखड्डा शोचालय साठी ग्रामपंचायतीने विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व बाबींची पूर्तता केल्यास स्वच्छता राखण्यास मदत मिळेल तसेच स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात जिल्ह्याला बहुमान मिळण्यास मदत होईल. 

त्यानुसार गावपातळीवर स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत पूर्व तयारीसाठी कामाला लागावे अशा सूचना दिल्या आहेत.यापूर्वी देखील जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचार्यांनी बेस लाईन सर्व्हेक्षण नुसार सौचालय बांधकाम केलेल्या गावात जाऊन नागरिक उघड्यावर बसत तर नाहीत याची चाचपणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावात मुक्काम ठोकून नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वछता विभागाने कंबर कसली होती. उघड्यावर बसणाऱ्या लोटा बहाद्दरवर कारवाई देखील केली होती. त्यामुळे अनेक गावे पांदणमुक्त झाली आहेत. तर काही गावात अद्यापही नागरिक सौचालय वापरत नसून उघड्यावर बसण्याचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा पथकाकडून कारवाई केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे