Hingoli : बाळासाहेबांच्या शिवसेनेत अनेकांनी प्रवेश केला ; आ.बांगर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Santosh Bangar

Hingoli : बाळासाहेबांच्या शिवसेनेत अनेकांनी प्रवेश केला ; आ.बांगर

आखाडा बाळापूर : बऊर येथील अनेकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबद्दल त्यांचा आमदार संतोष बांगर यांनी सत्कार केला.बऊर येथील शहीद परसराम खंदारे यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी १० लाख व बौद्ध विहार जवळ सभामंडपासाठी १० लाख असा एकूण २० लाख निधी देणार असल्याचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले. तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेत येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत करून तुमच्या प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी मी तुमच्या मदतीसाठी तत्पर राहील, असा विश्वास देखील बांगर यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला.

यावेळी सह संपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, माजी जि. प. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, माजी समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, पिंटू पतंगे कांडलीकर, गुड्डूभाऊ बांगर, किसन कोकरे आदी उपस्थित होते. बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्यांत तुळशीराम खंदारे, निवृत्ती पाईकराव, माधव खंदारे, रामराव खंदारे, गौतम खंदारे, दादाराव खंदारे, गंगाधर खंदारे, गुलाब खंदारे, अशोक खंदारे, चंद्रमुनी खंदारे, मंचक खंदारे, राघोजी खंदारे, प्रभाकर खंदारे, पुंजाराव कोकरे, सोनबा राव कोकरे, शेख मन्नान, विशाल खंदारे, साहेबराव पाईकराव, मिलिंद खंदारे, दयानंद खंदारे, विजय खंदारे, ज्ञानेश्वर खंदारे, सुभाष खंदारे, साहेबराव खंदारे आदींचा समावेश आहे.