esakal | हिंगोली जिल्ह्याची दुसऱ्या स्थानावर झेप 
sakal

बोलून बातमी शोधा

GHARKUL

हिंगोली जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सहा हजार ९७८ घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्‍यानुसार शुक्रवार अखेर पाच हजार ४५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. वाळूचे दर गगनाला भिडल्याने बांधकामावर परिणाम जाणवत आहे. 

हिंगोली जिल्ह्याची दुसऱ्या स्थानावर झेप 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून २०१६-१७ ते २०१९-२० घरकुल योजनेत शुक्रवार (ता.१४) अखेर ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. घरकुल बांधकमात जिल्ह्याने विभागातून दुसऱ्या; तर राज्यात तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. 

जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुल योजनेची कामे केली जातात. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्‍ह्याला सहा हजार ९७८ घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्‍यानुसार शुक्रवार अखेर पाच हजार ४५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित एक हजार ९३३ घरकुलाचे बांधकाम अपूर्ण आहेत.

हेही वाचासत्तर एकरात कांदा बिजोत्‍पादन

राज्यात तिसऱ्या क्रमांकावर झेप

 यामध्ये औंढा तालुक्‍यात २९४, वसमत ४५४, हिंगोली २६०, कळमनुरी ३४८, सेनगाव तालुक्‍यातील ५८९ बांधकामांचा समावेश आहे. तरीही पंतप्रधान आवास योजनेच्या बाबतीत राज्यात हिंगोली जिल्हा परिषदेने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या शिवाय रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्‍ह्याला पाच हजार ७६६ घरकुल बांधकामांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्‍यापैकी तीन हजार ६४६ बांधकामे पूर्ण करण्यात आली. दोन हजार १२० घरकुले प्रगतीपथावर आहेत.

एक हजार ६३ घरकुलाचे काम पूर्ण

 यामध्ये औंढा तालुक्‍यातील २७०, वसमत २९६, हिंगोली ४९४, कळमनुरी ४५४; तर सेनगाव तालुक्‍यातील ५६२ घरकुलांचा समावेश आहे. तसेच शबरी आवास योजनेमध्ये २०१६-१७ ते २०१९-२० वर्षातील दोन हजार ९८३ घरकुलांपैकी एक हजार ६३ घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. पारधी आवास योजनेमध्ये ३५ पैकी ३४ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान आवास, रमाई, शबरी, पारधी घरकुल बांधकामासाठी जिल्ह्याला १५ हजार ७६२ घरकुलाचे उद्दिष्ट दिले होते.

सरस कामगिरी बजावली 

 त्यासाठी १८ हजार लाभार्थींनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी नऊ हजार ७८८ घरकुल पूर्ण झाले आहेत. घरकुलाच्या बाबतीत हिंगोली जिल्हा परिषदेने विभागातून दुसरा क्रमांक पटकावला असून इतर जिल्ह्याच्या मनाने सरस कामगिरी बजावली आहे. दरम्यान, मध्यतंरी घरकुल बांधकामासाठी वाळू उपलब्ध झाली नसल्याने लाभार्थींची मोठी अडचण निर्माण झाली होती. शासनाने घरकुल लाभार्थींना पाच ब्रास वाळू देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, भाव गगनाला भिडल्याने कामे संथगतीने सुरू आहेत. 

येथे क्लिक करासव्वा लाखाचे पाणी पाऊच साहित्य जप्त

उद्दिष्ट शंभर टक्‍के साध्य करता येणार

उर्वरित घरकुलांची कामे वेळेवर लाभार्थींनी पूर्ण केल्यास दिलेले उद्दिष्ट शंभर टक्‍के साध्य करता येणार आहे. नवीन लाभार्थींना नवीन घरकुलाचा लाभ देखील मिळणार आहे. 
-धन्वंतकुमार माळी, प्रकल्‍प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

 

loading image