

gutkha mava
हिंगोली : शहरालगत खटकाळी बायपास येथे स्थानिक गुन्हे शाखा व हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शनिवारी (ता.१९) सकाळी तीन तासांच्या नाकाबंदीनंतर एक स्कार्पिओ वाहन पकडले. त्यात गुटख्यासह वाहन असा १७.९० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त तर तोफखाना भागात दोन कारसह १६ लाख असा एकूण ३३ लाख ९० हजारांचा गुटखा जप्त केला.
नांदेडकडून एका स्कार्पिओतून मोठ्या प्रमाणावर गुटखा विदर्भाकडे नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी तातडीने पोलिस पथक स्थापन केले.