esakal | हिंगोली : अपहरण झालेल्या १४ वर्षाच्या बालीकेची सुटका; बासंबा पोलिसांची कामगिरी

बोलून बातमी शोधा

file photo}

बासंबा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या चिंचोली येथून मंगळवारी (ता. २३) १४ वर्षीय बालीकेचा शेजारी नातेवाईकांच्या घरी असलेल्या अनोखळी पाहुणीने आमिष दाखवुन अपहरण केले होते.

हिंगोली : अपहरण झालेल्या १४ वर्षाच्या बालीकेची सुटका; बासंबा पोलिसांची कामगिरी
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : अपहरण झालेल्या १४ वर्षाच्या बालीकेची काही तासातच आरोपीच्या तावडीतुन सुखरुप सुटका करुन आरोपींना गुरुवारी (ता. २५)  बासंबा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बासंबा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या चिंचोली येथून मंगळवारी (ता. २३) १४ वर्षीय बालीकेचा शेजारी नातेवाईकांच्या घरी असलेल्या अनोखळी पाहुणीने आमिष दाखवुन अपहरण केले होते. त्याबाबत पोलिस ठाणे बासंबा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलु व त्यांचे पथकाने तात्काळ तपासाची चक्रे गतिमान करित नमुद मुलीचे अपहरण केलेल्या आरोपी महिला व तिचा सहकारी यांचे बाबत गोपनिय रित्या माहिती मिळविली व मागिल दोन दिवसापासुन सातत्याने पोलिस पथक सायबर शाखेतील अंमलदार व गोपनीय खबरी यांचे मदतीने गुन्ह्यातील पिडीत मुलीचा शोध घेण्याकरिता प्रयत्न करत होते. 

त्यातच गुरुवारी (ता. २५)  रोजी पोलिस पथकास माहिती मिळाली की, अपहरण केलेल्या मुलीस घेवुन आरोपी महिला व तिचा सहकारी मारोती डांगे हे रेल्वेने नांदेडकडे येणार आहेत. अशा माहितीवरुन श्री. मलपिलु व त्याचे सोबत श्री. हराळ, प्रविण राठोड, बंडु राठोड, वंदना ढवळे यांनी परभणी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावला व सदर ठिकाणी तब्बल सात पोलिस पथक पिडीत मुलीचा व अपहरण केलेल्या आरोपीचा शोध घेत होती.

यावेळी औरंगाबाद येथुन आलेल्या एका रेल्वेमधुन अतिशय शिताफीने पोलिसांनी पिडीत मुलीस, आरोपी महिला व तिचा सहकारी आरोपी पुरुष यांना ताब्यात घेतले. एका फिल्मीस्टाईलप्रमाणे तब्बल सात तास पाच रेल्वे तपासुन पोलिस पथकाने पिडित मुलीची सुखरुपरित्या आरोपींचे ताब्यातुन सुटका करुन घेतली व आरोपींना ताब्यात घेतले. सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली बासंबा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलु व त्यांच्या पथकाने केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे