हिंगोली : निवडणुकीसाठी कागदपत्रे जमा करण्यासाठी पुढाऱ्यांची धावपळ

विठ्ठल देशमुख
Friday, 25 December 2020

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी ता.२३ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंतच आहे. त्यामध्ये ता.२५, २६, २७ हे तीन दिवस कार्यालयीन सुट्ट्या असल्यामुळे पुढाऱ्यांची कागदपत्रे जमा करण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली आहे.

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्यासाठी पुढाऱ्यांची धावपळ होताना पहायला मिळत आहे. पहिला आणि दूसरा दिवस निरंक आहे. मध्ये तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्यामुळे अर्जासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी ता.२३ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंतच आहे. त्यामध्ये ता.२५, २६, २७ हे तीन दिवस कार्यालयीन सुट्ट्या असल्यामुळे पुढाऱ्यांची कागदपत्रे जमा करण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली आहे. सेनगाव तालुक्यात ९७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.अर्ज सादर करण्याचा पहिला आणि दूसरा दिवस खाली गेला असून या दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे दोन्ही दिवस निरंक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मागच्या पंचवर्षीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे खुप कमी प्रमाणात होती.

हेही वाचा -  आमदार रत्नाकर गुट्टेना ईडीचा झटका, अडीचशे कोटींची मालमत्ता जप्त, परभणी जिल्ह्यात खळबळ

परंतु यावेळी सदस्य पदासाठी उमेदवारी अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जास्त व कार्यालयीन असल्यामुळे निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांची मोठी धावपळ होताना पहायला मिळत आहे. मध्ये तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्यामुळे पुढाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही कागदपत्रे जमा करण्यासाठी शासकीय कार्यालये सुरु असणे गरजेचे आहे. मात्र अर्ज सादर करण्यासाठी शासनाने केवळ आठ दिवसाचा कालावधी दिला आहे. परंतु त्यामध्ये सुध्दा दिवस सुट्ट्या असल्यामुळे कागदपत्रे जमा करण्यासाठी मोठी धावपळ होताना दिसून येत आहे. 

सेनगाव तालुक्यात दोन दिवस निरंक गेले असून मध्ये तीन दिवसाच्या सुट्ट्या आहेत. तर पुढचे तिनच दिवस कागदपत्रे जमा करण्यासाठी असतील. त्यामुळे निवडणुकीच्या रणांगनात उतरणाऱ्या पुढाऱ्यांची मोठी गैरसोय होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. अर्धवट कागदपत्रे घेऊन येत असल्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यामुळे अर्ज सादर करण्याचा कालावधी वाढवण्याची गरज भासत आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Leaders rush to submit election documents hingoli news