हिंगोली : सेनगाव नगरपंचायतची आरक्षण सोडत जाहीर

विठ्ठल देशमुख
Friday, 27 November 2020

सेनगाव नगरपंचायतची स्थापना १५ जुलै २०१५ ला झाली. मागच्या वेळी १७ नगरसेवकांपैकी ११ महिलांचे राज्य होते. यावेळी ५० टक्के महिलांना जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : येथील नगरपंचायतची प्रभागनिहाय आरक्षण सोडत शुक्रवार (ता.२७) उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली.

सेनगाव नगरपंचायतची स्थापना १५ जुलै २०१५ ला झाली. मागच्या वेळी १७ नगरसेवकांपैकी ११ महिलांचे राज्य होते. यावेळी ५० टक्के महिलांना जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सेनगाव नगरपंचायतची आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण महिला, प्रभाग दोन सर्वसाधारण पुरुष, प्रभाग तीन सर्वसाधारण महिला, प्रभाग चार नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग पाच नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग सहा सर्वसाधारण पुरुष, प्रभाग सात सर्वसाधारण महिला, प्रभाग आठ सर्वसाधारण पुरुष, प्रभाग नऊ सर्वसाधारण पुरूष, प्रभाग दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, प्रभाग.११ अनुसूचित जमाती सर्वसाधारण, प्रभाग १२ सर्वसाधारण महिला, प्रभाग १३ अनुसूचित जाति महिला, प्रभाग १४ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, प्रभाग १५ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग १६ अनुसूचित जाति महिला, प्रभाग १७ सर्वसाधारण पुरुष असे एकूण १७ पैकी १७ प्रभागनिहाय आरक्षण सोडत लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे करण्यात आली आहे. 

हेही वाचाहिंगोली जिल्ह्यातील रमाई आवास योजनेचा निधी उपलब्ध करून द्यावा- खासदार हेमंत पाटील 

या आरक्षण सोडतीवर अनेकांचे स्वप्न दुभंगले असल्याचे पहायला मिळते आहे. तर काही ठिकाणी समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार जीवनकुमार कांबळे, मुख्याधिकारी शैलेश फडसे, पोलिस उपनिरीक्षक बाबूराव जाधव आदिसह तहसील व नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच शहरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Leaving the reservation of Sengaon Nagar Panchayat announced hingoli news