हिंगोली : जिल्ह्यात विज गुल, मीटर चालू, शेतकरी अडचणीत

file photo
file photo

हिंगोली : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामाचा पेरा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे . दिड लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे . पिकेही आता बहरत आहेत . या पिकांना पाणी देणे  गरजेचे बनले आहे . सध्याच्या परिस्थितीत शेतशिवारात विजेची मागणी मोठ्या प्रमाणवर आहे.अशा स्थितीत शेतकरी रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा आवश्यक असताना तो  विस्कळीत होत  आहे .  रब्बीच्या  पिकावर त्याचा  परिणाम होत आहे . दिवसभर विज गूल राहत असून मिटर मात्र चालुच आहे . 

असे शेतकरी सांगत आहेत. यंदाच्या खरीप हंगामात मृग नक्षत्रातच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी केली . यात अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही . बोगस बियाणामुळे हा प्रकार घडला . याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या . त्यावरून कृषीच्या कर्मचाऱ्यांनी स्थळ पाहणी केली . त्यामुळे मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना लागली. मात्र अजुनही त्याचा थांगपत्ता नाही . यातून सावरत शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली जुन ते ऑक्टोंबर महिन्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले.ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे तरशेतकऱ्यांच्या हाततोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला . 

खरीपातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले . त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले . यानंतर दिलासा दायक बाब म्हणजे परतीचा पाऊस जोरदार बरसल्याने रब्बीचा पेरा वाढला . शेतकऱ्यांची आर्थिक मिस्त टिकुन आहे. रब्बीची पेरणी केल्यापासूनच जिल्ह्यातील शेतशिवारामध्ये त्याचा विजपुरवठा सुरळीत राहत नसल्याच्या तक्रारी महावितरण कंपनीच्या विविध कार्यालयाकडे ऑक्टोंबर शेतकऱ्यांनी केल्या आहेत.मात्र विजेची मागणी मोठ्या प्रमाणवर असल्याने विज देणेही शक्य होत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यावर येवून ठेवली आहे .

जिल्ह्यातील शेत शिवारासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत . मध्यतरी आडगाव मुटकुळे येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रासमोर परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते . या आंदोलनाची दखल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेऊन वीज पुरवठ्या विषयी अधिकाऱ्यांना जाब विचारला होता . याच प्रकारे विविध स्तरातून अनेक शेतकऱ्यांतून वीज पुरवठ्याबाबत तक्रारी केल्या जात आहेत . वीज पुरवठा सुरळीत राहत नसल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर , इंजिन च्या मदतीने पिकांना पाणी देण्याची वेळ येत आहे . यासाठी शेतकयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जोर धरत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com