नांदेड : एसपी शेवाळेंचा मास्टरस्ट्रोक, दोन टोळीविरुद्ध लावला मोक्का, अन्य टोळ्या वेटिंगवर, गुन्हेगारांचे दणाणले धाबे 

file photo
file photo

नांदेड : मागील काही दिवसांपासून खंजर, तलवार व पिस्तुलचाधाक दाखवून मोठे व्यापारी, डॉक्टर्स यांच्यासह राजकीय व्यक्तींनाही धाक दाखवून खंडणी मागण्याची परंपरा गुन्हेगारांनी सुरु केली होती. मात्र आता असे प्रकार चालू देणार नाही. असा सज्जड दम पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी देत दोन टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी ( मोक्का) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन गुन्हेगारांना मास्टरस्ट्रोक लावला आहे. त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून येणाऱ्या काळात लवकरच तीन टोळीविरुद्ध मोक्का लावण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली.

पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी जिल्ह्याचा पदभार स्विकारताच जुना मोंढा भागात दिवसाढवळ्या एका टोळीने फिल्मीस्टाईल फायरिंग करुन दहशत पसरली होती. यावेळी या गोळीबारात आकाशसिंह राजेशसिंह परीहार हा पानठेलाचालक जखमी झाला होता. ही घटना चार ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जुना मोंढा परिसरातील महाराजा रणजीतसिंह मार्केट येथे हे घडली होती. यावेळी हल्लेखोरांनी विजय मोहनदास धनवानी (वय ३७) यांच्या दुकानात घुसून जबरीने १० हजार लंपास केले होते.

सीसीटीव्ही फुटेजचा महत्वाचा आधार

घटनास्थळाला पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, इतवारा पोलिस ठाण्याचे साहेबराव नरवाडे यांनी तातडीने भेट दिली. घडलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी आरोपी पोलिसांच्या नजरेत निष्पन्न झाले. रात्रीच नाकाबंदी करुन आरोपींची धरपकड केली.

पहिल्या टोळीतील हे आहेत आरोपी 

विशाल गंगाधर आंबे (वय २२) राहणार शिवशक्तीनगर, कलामंदिर, नांदेड, आदर्श उर्फ आद्या अनिल कामटीकर  (वय २०) राहणार महाविर चौक नांदेड, संजू किसन गुडमलवार (वय २४) राहणार गुरुद्वारा गेट क्रमांक तीन, धनराजसिंह उर्फ राणा दीपकसिंह ठाकूर (वय १८) राहणार शिवशक्तीनगर, कलामंदिर नांदेड, लखन दशरथसिंह ठाकूर (वय २८) राहणार गुरुद्वारा गेट क्रमांक दोन चिखलवाडी आणि प्रसाद नागनाथ अवधूतवार (वय १९) राहणार गुरुद्वारा गेट क्रमांक दोन चिखलवाडी यांना अटक केली.

पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची भुमिका महत्वाची 

त्यांच्याकडून त्यांच्या अंगावरील कपडे, दोन पिस्टल, चार जिवंत काडतुस, तीन दुचाकी, एक खंजर आणि नगदी दहा हजार रुपये असा ऐवज जप्त केला होता. या गुन्हेगारांची वाढती गुन्हेगारी व त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्याकडे पाठविला. उपमहानिरीक्षक श्री तांबोळी यांनी तात्काळ मंजुरी देत या टोळीविरुद्ध मोक्का लावण्यास आदेश दिले. यावरुन इतवारा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वाढ करुन त्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे करत आहेत.

दोन मुलांचे केले होते खंडणीसाठी अपहरण

तसेच दुसऱ्या एका गुन्ह्यात लोहा पोलिस ठाणे अंतर्गत दुसऱ्या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. या प्रकरणाची हकीकत अशी की ता. पाच ऑगस्ट रोजी चारच्या सुमारास सायाळ रोड, तालुका लोहा येथून जमुनाबाई संतोष गिरी (वय ३५) हिचा मुलगा शुभम (वय सोळा) व तिच्या बहिणीचा मुलगा विजय प्रभू गिरी (वय १८) यांना आरोपीतांनी संगनमताने कट रचून पैशासाठी अपहरण करुन वीस हजाराची मागणी केली होती. पैसे नाही दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली व मारहाण करुन त्यांना डांबून ठेवले होते. याप्रकरणी लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अपहृत मुलाची तीन दिवस टाटा सफारी (एमएच २४के-०००८) विविध ठिकाणी घेऊन फिरत असताना अपहरत मुलगा आरोपीच्या ताब्यातून सोडत असताना आरोपीने पोलिसांच्या अंगावर गावठी कट्टा, खंजर, लाकडी दांडके घेऊन धावून आले. यावेळी स्थानिक गुन्हे शाीखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपी विकास हटकर याच्या पायात गोळी लागून जखमी झाला. त्यानंतर त्याच्या ताब्यातून या दोन्ही मुलांची पोलिसांनी सुखरुप सुटका केली. हा प्रकार ता. सात ऑगस्ट रोजी दुपारी साडे पाचच्या सुमारास लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मरळक शिवारात घडला. या प्रकरणाचा लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

मोक्काअंतर्गत ही आहे दुसरी टोळी

ज्या टोळीयुद्ध लोहा पोलिसांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशावरुन विकास सुभाष हटकर (वय २६) राहणार पांगरी, विष्णूपुरी ता. नांदेड देड, धोंडिराज ऊर्फ बंटी सूर्यकांत नवघरे (वय २३) राहणार हडको, सुरज तुकाराम मामिडवार (वय २३) राहणार बंदा घाट नांदेड, शेख असिफ शेख छोटुमिया राहणार सुनेगाव तालुका लोहा, दत्ता हंबर्डे राहणार विष्णुपुरी नांदेड आणि गोविंद निळकंठ पवार राहणार पार्डी तांडा तालुका लोहा यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात वाढ करुन मोक्काची कारवाई केली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे करत आहेत. 

जिल्ह्यात कुठलीही गुंडगिरी चालू देणार नाही 

पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी लक्ष घालत या दोन प्रकरणात मोक्काची कारवाई केली. येणाऱ्या काळात लवकरच तीन टोळ्यांविरुद्ध मोक्का लावण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले होते. धडाकेबाज कारवायांमुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात कुठलीही गुंडगिरी चालू देणार नाही असा विडा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे व त्यांच्या पोलिस दलाने उचलला असलल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com