esakal | हिंगोली : आमदार सतीश चव्हाण यांना प्राध्यापकांनी घातले साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राज्यसरकारने १४ ऑक्टोबरला विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक ,उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांना १३ सप्टेंबर२०१९ च्या शासन निर्णय नुसार २० टक्के अनुदान व ज्या शाळा महाविद्यालय २० टक्के  अनुदान घेत आहेत.

हिंगोली : आमदार सतीश चव्हाण यांना प्राध्यापकांनी घातले साकडे

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : प्रचलित नियमानुसार पगार देऊन तात्काळ शिक्षकांच्या खात्यात जमा करावा अशी केली मागणी प्राध्यापकांनी आमदार सतीश चव्हाण यांची भेट घेऊन शनिवारी (ता. २८) केली आहे.

राज्यसरकारने १४ ऑक्टोबरला विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक ,उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांना १३ सप्टेंबर२०१९ च्या शासन निर्णय नुसार २० टक्के अनुदान व ज्या शाळा महाविद्यालय २० टक्के  अनुदान घेत आहेत, त्यांना वाढीव ४०टक्के टप्पा एक  नोव्हेंबर २०२० पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला .पण हा निर्णय शिक्षकांच्या मागणीच्या विरोधात असून त्यामुळे शिक्षकांच्या मनात प्रचंड रोष निर्माण होत आहे.     

सेनगाव येथे रास्ता रोखुन त्यांना घेराव घालण्यात आला                                      

पदवीधर आमदार सतीश चव्हाण हे हिंगोली येथे आले असता त्यांना महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेच्या वतीने औंढा हिंगोली तसेच सेनगाव येथे रास्ता रोखुन त्यांना घेराव घालण्यात आला व हा निर्णय तात्काळ बदलून १३ सप्टेंबर २०१९ प्रमाणे प्रचलित नियमानुसार १९  महिन्याचे हक्काचं पगार व अघोषित शाळा महाविद्यालय यांना घोषित करून तात्काळ निधी वाटप करावा या विविध मागण्यांसाठी प्राध्यापकानी आमदार सतीश चव्हाण यांना रस्त्यात अडवून चांगलेच धारेवर धरले.     

हेही वाचा -  परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली 

राज्याची आर्थिक स्थिती  खराब असून जे २० टक्के मंजूर झाले आहे ते पदरात पाडून घ्या.

यावेळी सतीश चव्हाण यांनी ठोसपणे सांगितले की राज्याची आर्थिक स्थिती  खराब असून जे २० टक्के मंजूर झाले आहे ते पदरात पाडून घ्या.व राहिलेल्या एक एप्रिल १९चा पगार मी तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात मिळवून देतो तसेच अघोषित, नैसर्गिक तुकड्यांना सुद्धा अनुदान मंजूर या अधिवेशनात करून त्यांना सुद्धा अनुदान देण्यात येईल व प्रचलित नियमानुसार अनुदानाचा निर्णय हा दोन फेब्रुवारी महिन्यात काढण्यात येईल व अगोदर तुम्हाला हा एक नोव्हेंबरचा पगार हा डिसेंबर महिन्याच्या पहिले मिळवून देणार असे ठोस आश्वासन दिले. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असे सांगितले.   

यांची होती उपस्थिती 

यावेळी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटना हिंगोली येथील प्रा. सुनील डुकरे, प्रा. विष्णू उबाळे, प्रशांत चाटसे, प्रा. राजेश बगाटे, सुनील जगताप, प्रा. संतोष इंगळे, प्रा. अरविंद सावळे, प्रा. पवन गिलबिले, प्रा. गौतम दिपके, प्रा. उमेश शेळके, प्रा. विशाल कांबळे, प्रा. गजानन उबाळे प्रवीण भट प्रा. अमोल सावळे, प्रा. डोलारे सर, प्रा. विकास खणपटे.प्रा. निलेश साळवे, प्रा. आशिष इंगळे  आदींची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top