हिंगोलीत मोबाईल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात; चार लाखाचे मोबाईल जप्त- पंडित कच्छवेंची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली शहर पोलिस

हिंगोलीत मोबाईल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात; चार लाखाचे मोबाईल जप्त- पंडित कच्छवेंची कारवाई

हिंगोली : शहरातील लाँकडाऊन असल्याने पोलिसांचे गस्त पथक (Hingoli Police petroling) करीत असताना बसस्थानकात असलेल्या एका संशयितांची (One accused arest) चौकशी केली असता त्याच्याकडून चोरीचे वेगवेगळ्या कंपनीचे विस मोबाईल ज्याची किमत तीन लाख ८१ हजार जप्त केले. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनातर्फे बुधवार (ता. १२) देण्यात आली. (Hingoli mobile thief caught by police; Four lakh mobiles seized - Pandit Kachhve's action)

याबाबत दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता. ११) रोजी दुपारी बारा वाजता पेट्रोलींग पथकातील कर्मचारी शेख शकील, सुधीर ढेंबरे, गजानन होळकर हे लॉकडाउन असल्याने गस्त करीत असतांना बसस्थानकात एक संशयीत व्यक्ती मिळुन आला. त्याचे नाव अरविंद वाढे रा. सुतारवाडा, हिंगोली असे आहे.

हेही वाचा - नांदेडचा कोरोना दर घसरला मात्र लसीकरणासाठी नागरिकांची भटकंती

पथकाने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ चार अँनरॉईड मोबाईल सापडले. सदर मोबाईलबाबत त्यास विचारणा केली असता तो उडवाउडवीचे उत्तर देत असल्यामुळे चारही मोबाईल हे चोरीचे असल्याचा संशय आल्याने दोन पंचासमक्ष त्याचे घरी व इतर ठिकाणी झडती घेण्यात आली. त्याचे ताब्यात एकूण वेगवेगळ्या कंपनीचे २० मोबाईल जप्त केले. त्याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ज्या नागरीकांचे मोबाईल चोरी गेले आहेत त्यांनी आय.एम.ई.आय नंबर बाबत खात्री करुन मुळ पावती घेउन शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, शेख शकील, सुधीर ढेंबरे, गजानन होळकर, दिलीप बांगर यांनी केली आहे. तर गुन्हयाचा तपास राजुदास जाधव करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Web Title: Hingoli Mobile Thief Caught By Police Four Lakh Mobiles Seized Pandit Kachhves

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top