हिंगोली : सासू अन पतीने पत्नीचे केले औक्षण, जिजाऊ ब्रिगेडचा उपक्रम 

राजेश दारव्हेकर
Thursday, 19 November 2020

मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जिजाऊ, सावित्रीबाई फुले महाराणी ताराराणी, रमाई आदी महापराक्रमी महिलांचे पूजन करण्यात येते.  याशिवाय घरात पत्नी, आई बहीण मुलगी घरातील महिलाही सौभाग्याची लक्ष्मी आहेत

हिंगोली : सासू सुनेचे नाते अधिक वृद्धिंगत व्हावे होऊन विज्ञानवादी दृष्टिकोन वाढीस लागावा, महिलांना मानसन्मान मिळावा यासाठी यंदा जिजाऊ ब्रिगेडच्या पुढाकाराने अनोख्या पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले.  राज्यभरात मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सावित्री, जिजाऊंचे तर काही घरांमध्ये पतीने पत्नीचे तसेच माता पित्यांनी आपल्या कन्येचे औक्षण केले. 

मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जिजाऊ, सावित्रीबाई फुले महाराणी ताराराणी, रमाई आदी महापराक्रमी महिलांचे पूजन करण्यात येते.  याशिवाय घरात पत्नी, आई, बहीण, मुलगी घरातील महिलाही सौभाग्याची लक्ष्मी आहेत. मानवतावादी व वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून घरात सुना व लेकींच्या पूजनाचे आव्हान करण्यात आले होते. या आवाहनाला राज्यभरात जिजाऊ ब्रिगेड यासह विविध काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून  प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा -  नांदेड : सरपंच पदाचे आरक्षण आज, जिल्ह्यातील सर्वच १३०९ ग्रामपंचायतींचा समावेश

दरम्यान कौटुंबिक कलहाचे प्रमाण राज्यभरात वाढले अशा पार्श्वभूमीवर कुटुंबामध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा म्हणून लेकी सुनांचे पूजन करण्यात आले शहरी भागासह ग्रामीण भागात सासूने सुनेचे तर सुनेने सासूचे औक्षण केले.तसेच पतीने पत्नीचे औक्षण केले. काही घरांमध्ये माता पित्यांनी आपल्या कन्येच्या पूजन केले. लक्ष्मीच्या रूपाने घरातील महिलांचे पूजन केले. गृहलक्ष्मीला आदराचे स्थान देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.शुल्लक कारणांनी निर्माण झालेला दुरावा दूर होऊन सलोखा निर्माण व्हावा या उद्देशाने हा उपक्रम जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राज्यभर राबविण्यात आला.  

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आधुनिक पुरोगामी लक्ष्मीपूजन घरोघरी मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी समुपदेशन केले होते. या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद हिंगोली जिल्ह्यातसुद्धा मिळाला. ज्या कुटुंबांनी यात सक्रिय सहभाग घेतला त्यांचे आभार .

- राजश्री क्षीरसागर,  जिल्हाध्यक्ष ,जिजाऊ ब्रिगेड

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Mother-in-law and husband's wife's axing, Jijau Brigade's initiative hingoli news