हिंगोली नगरपालिका कर वसुलीसाठी आक्रमक; थकबाकीदार मालमत्ताधारकांना धास्ती 

राजेश दारव्हेकर
Saturday, 9 January 2021

हिंगोली नगर परिषदेच्या मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यापारी संकुल दुकानभाडे, मोबाईल टॉवर जागा भाडे आदींच्या वसुलीसाठी झोन निहाय वसुली पथके नियुक्त करण्यात आले आहेत.

हिंगोली : नगर परिषदेमार्फत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाची १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी विशेष वसुली मोहिम सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांनी वेळेत कराचा भरणा करणे गरजेचे आहे.

हिंगोली नगर परिषदेच्या मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यापारी संकुल दुकानभाडे, मोबाईल टॉवर जागा भाडे आदींच्या वसुलीसाठी झोन निहाय वसुली पथके नियुक्त करण्यात आले आहेत. जे नागरिक व व्यापारी या मोहिमेत नगर पालिकेचा कर भरणार नाहीत अशा विरुध्द जप्तीची मोहिम राबविण्यात येणार आहे.

ज्यामध्ये मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करणे नळ जोडणी खंडीत करणे , नगर परिषद व्यापारी संकुलनातील दुकानास सिल ठोकने थकबाकीदारांची नावे वृत्त पत्रात प्रसिध्द करणे तसेच शहरातील मुख्य चौकामध्ये थकबाकीदारांची नावे बॅनरद्वारे प्रसिध्द केली जाणार आहेत. हिंगोली नगर परिषद तर्फे सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाची १०० टक्के वसुलीची उद्दिष्ट पुर्ण करण्याकरीता वसुली मोहीम राबविली जाणार आहे . झोन निहाय विविथ कर वसुली करण्याकरीता पथके नियुक्त करण्यात आले असल्याने नागरिक व व्यापाऱ्यांनी कर भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांकडे   नगरपालिकेचा कर भरणा थकित असुन मार्च महिन्यात शंभर  टक्के वसुलीचे  उद्दिष्ट पुर्ण करण्याकरीता वसुलीसाठी झोननिहाय पथके नियुक्त करण्यात आले आहेत . त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांकडून सेंटर दुकान भाडे, मोबाईल टॉवर, मालमत्ता कर, पाणी पट्टी कर, शॉपिंग जागा भाडे आदींची वसुली केली जाणार आहे.त्यामुळे नागरिकांनी नगर पालिकेला सहकार्य करण्याची गरज असल्याचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे  यांनी केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli municipality aggressive for tax collection property owner hingoli tax news