esakal | शिलकी रकमेसह हिंगोली नगरपालिकेचा १११ कोटीचा अर्थसंकल्प सादर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तसेच नगरपालिकेस वसुलीही अपेक्षित  झाली नसल्याचे मुख्याधिकारी  डॉ.अजय कुरवाडे यांनी  बोलताना सांगितले.

शिलकी रकमेसह हिंगोली नगरपालिकेचा १११ कोटीचा अर्थसंकल्प सादर

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील नगरपालिकेचा चार लाख ८० हजार दोनशे रुपयाच्या शिलकी रकमेसह एकूण १११ कोटी २२ लाख ६० हजार रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी ता.२५ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावलेल्या लॉकडाउन संचार बंदीचा नगरपालिकेला मिळणाऱ्या सेवाकरावर मोठा परिणाम झाला. तसेच नगरपालिकेस वसुलीही अपेक्षित  झाली नसल्याचे मुख्याधिकारी  डॉ.अजय कुरवाडे यांनी  बोलताना सांगितले.

येथील  पालिकेचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर  यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नगर पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत चालू वर्षाचा २०२०-२१ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप  चव्हाण ,सभापती अमेर अली , गणेश बांगर ,गणेश लुंगे , सुरेश अप्पा सराफ ,निहाल भैया यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बंडू कुटे  व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यांच्यासह मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, उप मुख्याधिकारी उमेश हेंबाडे यांच्यासह पालिका कार्यालयातील अधिकारी उपस्थिती होते.

हिंगोली पालिकेने सर्वसाधारण सभा बोलावली होती ,मार्च एन्डची मालमत्ता कर वसुली मोहीम सुरू असून कोरोना काळात नागरिकांकडून थकीत कर गोळा केला जात आहे, याशिवाय मालमत्ता धारकाकडे थकीत रकमा आहेत अशा मालमत्ता धारकांच्या दुकानाला सिल ठोकले जात आहे. 

पालिकेने सादर केलेल्या अर्थ संकल्पात नगरपालिकेकडे एकूण महसुली उत्पन्न २९ कोटी ७० लाख ३० हजार रुपये एवढी असून भांडवली जमा ७६ कोटी ४० लाख एवढा आहे. १०६ कोटी १० लाख ३० हजार रुपये एवढी जमा असून , प्रारंभिक शिलकी सह १११ कोटी २७ लाख ४० हजार रुपये एवढे आहेत.  मूळ महसुली खर्च २९ कोटी ६५ लाख ५० हजार रुपये एवढा असून भांडवली खर्च ८१ कोटी ५७ लाख दहा हजार रुपये एवढा आहे. एकूण खर्च रक्कम १११ कोटी २२ लाख ६० हजार रुपये एवढी असून शिल्लक रक्कम ४ लाख ८० हजार २०० रुपये एवढी दाखविण्यात आली आहे.

यात लेखाशिर्ष निहाय शिफारस केलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे गटारे व नाले दुरुस्तीसाठी वीस लाख , रस्ता दुरुस्तीसाठी १५ लाख , शौचालय दुरुस्तीसाठी १५ लाख ,नाली करणे व नालीवर धापा टाकणे यासाठी वीस लाख , नालीवर धापा टाकणे पंधरा लाख , उत्सवासाठी तीन लाख रुपये, संत नामदेव महाराज रिंगण सोहळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती यावर २० लाख , नाली बांधकामासाठी १५ लाख , रस्ता बांधकामासाठी दहा लाख , बॉल शिफ्टिंग व अनुषंगिक कामांसाठी ३० लाख रुपये, बोअरवेल व विहिरींसाठी दहा लाख , अशी तरतूद करण्यात आली आहे. वाचनालयासाठी एमपीएससी पुस्तके विद्यार्थ्यांच्या मागणी व अभिप्राय यानुसार खरेदी करणे व अशोक नाईक यांच्या घराजवळील रस्ता तयार करणे यांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

अर्थसंकल्पाच्या सभेवर शिवसेनेचा बहिष्कार

 शहरात शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात नगरपालिकेकडून जाणीवपूर्वक विकासाची कामे केली जात नसल्याचा, तसेच पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे  नगरपालिकेतील गटनेते तथा बांधकाम सभापती श्रीराम बांगर यांनी आपल्या नगरसेवकांसह या सभेवर या सभेत न जाताच बहिष्कार टाकला. तसेच पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर पालिके विरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन दाद मागणार असल्याचे सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे