esakal | हिंगोली : हत्ता नाईक येथे तलवारीने सपासप वार करुन एकाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. आठ) तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. महेंद्र किशन ठोके (वय ३२) असे मयत तरुणाचे नांव असून त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.

हिंगोली : हत्ता नाईक येथे तलवारीने सपासप वार करुन एकाचा खून

sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील हत्ता नाईक येथे बांधकामाचे साहित्य घरासमोर टाकण्याच्या कारणावरुन एका तरुणाचा तलवारीने वार करून खून झाल्याची घटना घडली. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. आठ) तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. महेंद्र किशन ठोके (वय ३२) असे मयत तरुणाचे नांव असून त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथे नितीन ठोके याच्या घराचे बांधकाम सुरु असून त्यासाठी बांधकाम साहित्य आणून टाकण्यात आले. हे साहित्य महेंद्र ठोके यांच्या घरासमोरच टाकण्यात आले. घरासमोर बांधकाम साहित्य टाकू नको असे महेंद्र ठोके यांनी नितीन ठोके यास सांगितले होते. मात्र या कारणावरुन त्यांच्यात किरकोळ वादही  झाले होते. दरम्यान, बुधवारी (ता. सात) रात्री हा वाद पेटला. यावेळी शाब्दीक चकमकीनंतर नितीन ठोके याने तलवारीने महेंद्र ठोके यांच्या छातीवर वार केले. तर पुंजाजी ठोके व अन्य एकाने महेंद्र यांना मारहाण केली यात तो देखील जखमी झाला.

हेही वाचापरभणी ः रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या मेडीकलवर कारवाई

तलवारीने वार झाल्यामुळे जागीच कोसळलेल्या महेंद्र ठोके यांना रात्रीच सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. तर जखमी राहूल ठोके यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी राहूल ठोके यांच्या तक्रारीवरुन नितीन ठोके, पुंजाजी ठोके व अन्य एकाविरुध्द सेनगाव पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील, उपनिरीक्षक बाबुराव जाधव, अभय माकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी हत्ता शिवारातून पहाटेच नितीन ठोके यास अटक केली तर उर्वरीत दोघांना घरुनच अटक करण्यात आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image