
कर भरणा केल्यानंतर त्याची पावतीदेखील लगेच मिळणार आहे. हिंगोली पालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा व विविध प्रमाणपत्रांची माहिती यावर आहे
हिंगोलीकरांना आता व्हॉटस्अपवरून भरता येणार कर!
हिंगोली: हिंगोली पालिकेने आता नागरिकांसाठी एक सुविधा उपलब्ध केली असून घरबसल्या पालिकेचा कर व्हॉटस्अपच्या माध्यमातून भरता येणार आहे. त्यासाठी पालिकेने 'व्हॉटस्अप बेस टॅक्स कलेक्शन सिस्टीम' विकसित केली असून त्याचे उद्घाटन मंगळवारी (३ ऑगस्ट) झाले. हिंगोली पालिकेने माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ शहर सुंदर शहर, उत्कृष्ट घरकुल योजना यासह इतर अभियान असे उपक्रम राबविले असून शासनाने याची दखल घेतली आहे. शहरातील तसेच बाहेरगावी राहणाऱ्या हिंगोलीच्या नागरिकांना पालिकेचा कर भरण्याचा प्रश्न निर्माण होत होता. त्यासाठी मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी व्हॉटस्अप बेस टॅक्स कलेक्शन सिस्टीम विकसित करण्याचा निर्णय घेतला होता.
त्याप्रमाणे ती यंत्रना तयार करण्यात आली ज्याचे उद्घाटन मंगळवारी झाले. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, उमेश हेंबाडे, बाळू बांगर, पंडीत मस्के यांची उपस्थिती होती. शहरात मालमत्ता असलेल्या तसेच नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असलेल्या नागरिकांना व्हॉटस्अपच्या माध्यमातून कर भरता येणार आहे. पालिकेच्या मेसेज पाठविल्यानंतर त्या व्यक्तिच्या नावे किती मालमत्ता आहे, त्याची घरपट्टी किती, नळ पट्टी किती याची माहिती मिळणार आहे.
हेही वाचा: राज्यपाल कोश्यारी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर
कर भरणा केल्यानंतर त्याची पावतीदेखील लगेच मिळणार आहे. हिंगोली पालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा व विविध प्रमाणपत्रांची माहिती यावर आहे. यामध्ये कोणत्या प्रमाणपत्रासाठी काय कागदपत्रे लागतील याची देखील माहिती त्यात आहे.
कर गोळा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नागरिकांकडे जावे लागत होते. त्यामुळे आता मनुष्यबळ कमी लागणार आहे. पालिकेचे काम देखील तत्परतेने होणार आहे.
-अजय कुरवाडे (मुख्याधिकारी)
Web Title: Hingoli Nagar Parisahd Tax Can Pay On Whatsapp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..