हिंगोली : नागनाथ मंदीर उघडले आता नागनाथ उद्यान सुरु करा, भक्तांची मागणी 

कृष्णा ऋषी
Friday, 20 November 2020

मागच्या चार पाच वर्षात याठिकाणी येणाऱ्या भाविकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. म्हणूनच मंदिराचा परिसर सुंदर अद्यावत झालेला आहे. तसेच  संस्थांनच्या जागेवरील नागनाथ उद्यानही अत्यंत विलोभनीय आहे बाजूलाच औंढा तलाव असल्यामुळे या तलावांमध्ये येणाऱ्या पर्यटकांना बोटिंगचा हि आनंद घेता येतो

औंढा नागनाथ ( जिल्हा हिंगोली ) : बारा ज्योतिर्लिंगामधील महाराष्ट्रातील हे आठव्या स्थानावर तिर्थक्षेत्र औंढा नागनाथ आहे या  ज्योतिर्लिंगास निसर्गतः भरभरून असं सौंदर्य दिलेलं आहे .म्हणूनच येथे येणारा प्रत्येक भाविक दर्शनानंतर पर्यटनाचाही आनंद घेत असतो. सात महिण्यापासून बंद असलेले मंदिर सुरु झाल्याने आता नागनाथ उद्यान सुरू करावे अशी मागणी भक्ताकडून केली जात आहे.

मागच्या चार पाच वर्षात याठिकाणी येणाऱ्या भाविकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. म्हणूनच मंदिराचा परिसर सुंदर अद्यावत झालेला आहे. तसेच  संस्थांनच्या जागेवरील नागनाथ उद्यानही अत्यंत विलोभनीय आहे बाजूलाच औंढा तलाव असल्यामुळे या तलावांमध्ये येणाऱ्या पर्यटकांना बोटिंगचाही आनंद घेता येतो .गोकर्ण पहाडीवरील वन खात्याच्या अडीचशे एकर जमिनीवरील वन पर्यटन उद्यानही साक्षात निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी एकदम छान बनवलेला आहे .तेथेही बऱ्याच प्रमाणामध्ये पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असतात .नागनाथ मंदिर असो नागनाथ उद्यान वनपर्यटन असो या सगळ्या गोष्टींमुळे आणि निसर्गाने दिलेल्या सौदर्यामुळे औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंगाच्या रूपाने तर पुढे येतच आहे. परंतु एक सुंदरसं पर्यटन क्षेत्र ही लवकरच नावारूपाला येईल.परंतु कोरोना महामारी मुळे गेल्या सात महिन्यापासून बंद असलेली मंदिरे, पर्यटन स्थळ यामुळे या उद्यानाकडे बऱ्याच प्रमाणामध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे हेळसांड झालेली दिसून येत आहे. 

हेही वाचा औंढा तालुक्‍यात अतिवृष्टीच्या नुकसानीचे १४ कोटी ९७ लाखाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 

त्यातच नागनाथ उद्यान हे प्रायोगिक तत्वावर  खाजगी व्यक्तींकडे दिलेले असल्यामुळे त्यांची मुदत संपलेली आहे .तेव्हा लवकरात लवकर ह्याचा पुन्हा लीलाव होऊन हे पर्यटन उद्यान लवकरात लवकर विकसित व्हाव जेणे करून येणाऱ्या पर्यटकांना चांगली सुविधा उपलब्ध होईल. दिपावली पाडवा, भाऊबीज या मुहूर्तावर महाराष्ट्र शासनाने सर्व मंदिरे आणि पर्यटन स्थळे ही सुरू केलेले आहेत. त्यामुळे दिवाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक औंढा नागनाथ मंदिरातही दर्शनासाठी भेट देत आहेत .तसेच दर्शनानंतर नागनाथ उद्यान आणि वन उद्यान या ठिकाणीही भेटी देऊन बोटिंगचा ही आनंद घेण्यासाठी येत आहेत. तेव्हा नागनाथ उद्यान आणि वन उद्यान ही दोन्ही अद्यावत रित्या पर्यटकांसाठी सुरु करावी अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Nagnath temple opened Now start Nagnath Udyan, demand of devotees hingoli news