Narsi 11 KV Feeder Scam: नर्सी ११ केव्ही फिडर घोटाळा: ५० लाखांचे नियमबाह्य देयक, अधीक्षक अभियंता आर. एम. चव्हाण निलंबित

नर्सी ११ केव्ही फिडरमध्ये प्रशासकीय मान्यतेकडे दुर्लक्ष; अपूर्ण कामाचे ५० लाखांचे देयक मंजूर केल्याने अधीक्षक अभियंता चव्हाण यांच्यासह तिघांवर निलंबनाची कारवाई
Crime News

Mahavitaran has suspended a superintending engineer after a preliminary inquiry into alleged irregularities in the 11KV feeder project at Narsi in Hingoli district.

esakal

Updated on

हिंगोली : हिंगोली तालुक्यातील नर्सी (नामदेव) येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या ११ केव्ही फिडरच्या कामात गंभीर अनियमितता उघड झाल्यानंतर महावितरणने मोठी कारवाई केली आहे. प्रशासकीय मान्यतेनुसार काम पूर्ण न झाल्याचे समोर येऊनही सुमारे ५०.३७ लाख रुपयांचे देयक अदा केल्याप्रकरणी अधीक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांनी गुरुवारी (ता. ३०) निलंबनाचे आदेश जारी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com