
हिंगोली : नर्सी नामदेव येथे आषाढी एकादशीनिमित्त महापूजा
हिंगोली : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे आषाढी एकादशी निमित्त रविवारी ता. १० सकाळी साडेसहा वाजता तहसीलदार तथा संत नामदेव संस्थांचे अध्यक्ष नवनाथ वगवाड यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने, सुभाष हुले, भिकाजी महाराज किर्तनकार, नारायण खेडेकर, दाजीबा पाटील यांच्यासह डॉ. रमेश शिंदे, भानुदास वाबळे, भिकाजी कदम. माणिक लोडे, डॉ. सतीश शिंदे, विठ्ठल वाशिमकर, शाहूराव देशमुख, बालाजी वानखेडे, माधवराव पवार, सुभाष घुले, बद्रीनाथ घोगडे, विलास कानडे रामेश्वर माडगे, गजानन पाटील, जगन दुकानादार सवडकर आदींची उपस्थिती होती.
आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये मोठी गर्दी केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविक भक्तांनी शांततेत दर्शन घ्यावे यासाठी पोलीस उपनिरीक्षक नागरे. तसेच रामेश्वर मांडगे, दाजीबा पाटील, कांता गवते, शिवाजी कऱ्हाळे, माधव पवार, शाहूराव देशमुख यांनी भाविकांचे दर्शन शांततेत होण्यासाठी पुढाकार घेतला.
आषाढी एकादशी निमित्त महापुजेनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खूले करण्यात आले. त्या नतर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अनेक भाविकानी सकाळी सात वाजल्या पासूनच दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा होत्या. भाविकांच्या फराळाची व्यवस्था माणिकराव लोडे यांनी केली होती. यांच्यातर्फे १२ क्विंटल साबुदाणा उसळची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य पथक तळ ठोकून होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Web Title: Hingoli Narsi Namdev Ashadhi Ekadashi Maha Puja Temple Open
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..