Hingoli : चक्क मृत ग्रामसेवकाला कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination
Hingoli : चक्क मृत ग्रामसेवकाला कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश

Hingoli : चक्क मृत ग्रामसेवकाला कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश

सेनगाव (जि.हिंगोली) : तालुक्यामध्ये लसीकरण मोहीमेसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु सेनगावच्या तहसीलदाराने चक्क कोरोनामुळे मृत झालेल्या ग्रामसेवकाला कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. ओमिक्रॉममुळे केंद्र व राज्य सरकारकडून या नव्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य उपायोजना करण्याकरीता कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव होत असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. जिल्हाभरात लसीकरण पूर्णत्वास आणण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. सेनगाव (Sengaon) तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही लसीकरण झालेले नाही. त्यामुळे (Hingoli) ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने लसीकरण संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. (Hingoli News sengaon tahsildar order, dead gramsevak for corona vaccination campaign)

हेही वाचा: Aurangabad : शेंद्रा एमआयडीसीतील प्लास्टिक ग्रॅन्युअल्स युनिटला आग

यामध्ये तहसील कार्यालयामार्फत आरोग्य विभाग, ग्रामसेवक व इतर प्रशासकीय यंत्रणा गावागावांमध्ये जाऊन नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १६ डिसेंबर तहसील कार्यालयाकडून रोजी लसीकरणाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सेनगाव तालुक्यातील ७५ टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेली एकूण ४९ गावे आहेत. त्या गावातील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षण, स्वस्तधान्य दुकानदार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील रोजगार सेवक, ग्रामपंचायत सेवक यांच्या समवेत सर्व पात्र व्यक्तींनी घरोघरी जाऊन जनजागृती करण्यासाठी पथक स्थापन करण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत मुख्यध्यापक आणि ग्रामसेवकाच्या नावे लसीकरण मोहीम राबविण्यात यावे अन्यथा कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी काढण्यात आले आहे.

हेही वाचा: एक जानेवारीपासून Online Paymentच्या नियमात होणार बदल, जाणून घ्या कोणते

यामध्ये पिंपरी गावातील ग्रामसेवक कोरोनामुळे मृत झालेले ग्रामसेवक डी.डी.झिंगरे यांचे नाव आल्याने प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली. त्यामुळे तहसील प्रशासनावर विविध स्तरावरुन उलट-सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता यावर वरिष्ठ अधिकारी नेमके काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Hingoli News Sengaon Tahsildar Order Dead Gramsevak For Corona Vaccination Campaign

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Hingolicorona vaccination
go to top