esakal | हिंगोली : सिध्देश्वरचे नऊ दरवाजे उघडले, पूर्णा, कयादूला पूर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यात मागच्या आठ दिवसापासून रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण आहे. अधून मधून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभर संततधार पाऊस सुरू होता.

हिंगोली : सिध्देश्वरचे नऊ दरवाजे उघडले, पूर्णा, कयादूला पूर

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासापासून पावसाची संततधार सुरु असून सोमवार ता. १७ सकाळी अकरा वाजेपर्यंत ३०. ९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यामुळे नद्यांना पुर आला आहे तर सिध्देश्वर धरणाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

जिल्ह्यात मागच्या आठ दिवसापासून रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण आहे. अधून मधून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभर संततधार पाऊस सुरू होता.

कयाधु तसेच मधोमती व जलेश्वर नद्यांना पुर

या पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधु तसेच मधोमती व जलेश्वर नद्यांना पुर आला आहे. तसेच अनेक छोट्या मोठ्या नद्यांना देखील पाणी आले आहे. या पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद पिकात पावसाचे पाणी जमा झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात मागील चोवीस तासात सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ३०. ९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडळ निहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे हिंगोली मंडळात ५८.५, नरसी १६.८, सिरसम ४९ ५, बासंबा ४७.५ डिग्रस, माळहिवरा निरंक खांबाळा २८.७ एकूण २८.७ मिलीमीटर पाऊस झाला.

हेही वाचा जोरदार पावसाने पर्यायी पूलच गेला वाहून

जिल्ह्यातील मंडळनिहाय आकडेवारी

कळमनुरी मंडळात ४५.५, वाकोडी ५३.३, नांदापुर १४.३, बाळापुर ५८.८, डोंगरकडा २.५, वारंगाफाटा ७९.५, एकुण ४२.३ मिलीमीटर पाऊस झाला. वसमत ३०, आंबा २४.८, हयातनगर २१.८, गिरगाव २०.८, हट्टा १०.५, टेभुर्णी ३०.५, कुरुंदा ३७ एकूण २५ १ मिलीमीटर पाऊस झाला आहे.औंढा नागनाथ मंडळात ५२.३, येहळेगाव ३५.३, साळणा २८.५, जवळा बाजार ४३, एकूण ३९.८ मिलीमीटर सेनगाव १८ ८, गोरेगाव निरंक, आजेगाव १५.८, साखरा ३९.८, पानकनेरगाव ३४, हत्ता २२.७   एकुण २२.७ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

औंढा नागनाथ तालुक्यात येणाऱ्या सिध्देश्वर धरणात शंभर टक्के पाणीसाठा

जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात येणाऱ्या सिध्देश्वर धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. तर धरणाचे आज नऊ दरवाजे ऊघडून पुर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कळमनुरी तालुक्यातील इसापुर धरणात ५९.१८ टक्के  पाणीसाठा झाला आहे.दरम्यान या पावसामुळे पिकात पाणी जमा झाल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. आठ दिवसापासून शेतीची कामे खोळबंली आहेत. संततधार पाऊस व ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

सिद्धेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, सतर्कतेचा इशारा

औंढा नागनाथ  तालुक्यातील एकमेव मोठे प्रकल्प असलेल्या  सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणातून नदी पत्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वक्रद्वार ४ फूट उचलून ३३ हजार क्यूसेक्स पाणी नदीपत्रात

येलदरी धरणातून ३० हजार घनफुट प्रति सेकंद प्रमाणे पाणी सोडण्यात आल्या मुळे तसेच सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाचे दहा वक्रद्वार ४ फूट उचलून ३३ हजार क्यूसेक्स पाणी नदीपत्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्याचे संकेत पाटबंधारे विभागाचे अभियंता वसीउल्ला खान व अंकित तिवारी यांनी दिले असून पूर परिस्थिती उदभवण्याची शक्यता असल्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे