हिंगोली : जिल्ह्यात मागील वर्षात लाचखोरीत ग्रामविकास खाते अव्वल- उपाधीक्षक नितीन देशमुख 

राजेश दारव्हेकर
Monday, 14 December 2020

जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यासाठी लाचलुचपत विभागाच्या वतीने कितीही जनजागृती केली तरीही जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यलयात लाच घेतल्याशिवाय कामे केली जात नाहीत.

हिंगोली : मागील वर्षात लाच स्वीकारनाऱ्यात इतर विभागपेक्षा ग्रामविकास खाते जिल्ह्यात अव्वल असल्याची माहिती लाच लुचपत खात्याचे प्रभारी उपअधीक्षक नितीन देशमुख यांनी दिली.

 

जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यासाठी लाचलुचपत विभागाच्या वतीने कितीही जनजागृती केली तरीही जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यलयात लाच घेतल्याशिवाय कामे केली जात नाहीत. अगदी ग्रामपंचायत पातळी पासून ते विविध कार्यालयात लाच घेतल्याशिवाय कामे होत नाहीत त्यामुळे आतापर्यन्तच्या इतिहासात ५० रुपयांच्या मागणीसाठी तलाठ्याला लाचलुचपत  विभागाने जाळ्यात ओढले आहे.

 

जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत विविध विभागातील दहा अधिकारी ,कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडले आहे. यामध्ये सर्वात अधिक ग्रामविकास खात्याचे पाच कर्मचारी आढळून आले आहेत. त्याखालोखाल पोलीस विभाग एक, महसूल दोन,कृषी व आरोग्य प्रत्येकी एक अशा दहा लाचखोरांना लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली आहे.यामध्ये दहा लोकसेवकांकडून  ९० हजार ८०० रुपये लाचेची रक्कम हस्तगत केली आहे.

हेही वाचा नांदेड : विहिरीत पडलेल्या अस्वलाला जीवदान, वनविभागासोबत गावकऱ्यांचाही पुढाकार -

मागील वर्षात लाचखोरी मध्ये ग्रामविकास खाते अव्वल असून,आतपर्यंत पाच सापळ्यात ग्रामसेवक अडकले असल्याचे स्पस्ट झाले आहे. लाच खोरीचे प्रमाण जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी लाच लुचपत विभागाकडून प्रयत्न केले जात  आहेत. तरी देखील विविध विभागात नागरिकांची कामे करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी लाच घेतल्याशिवाय कामे करून देत नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांना अखेर लाच लुचपत कार्यालयाचे दरवाजे ठोठावे लागतात. त्यानंतर त्या प्रकरणाची शहानिशा करून लाचलुचपत विभागाला खात्री पटल्यानंतरच सापळा रचून कारवाई केली जाते.आतापर्यन्त सापळा कारवाईत दहा लोकसेवकाना ताब्यात घेऊन कारवाई केली असल्याचे प्रभारी उपधीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Nitin Deshmukh, Deputy Superintendent of Rural Development, was the highest bribe taker in the district last year hingoli news