
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण १८३ रुग्ण झाले असून त्यातील १०६ कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. सध्या ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या ३८१ संशयित भरती आहेत. यापैकी २३६ जणांचा अहवाल प्रलंबित आहे.
हिंगोली : शहरातील रिसाला बाजार भागातील एका ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मंगळवारी (ता.दोन) रात्री प्राप्त झाला. तसेच पोटा शेळके (ता. औंढा नागनाथ) येथील एका कोरोनामुक्त रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात एकूण १८३ रुग्ण झाले असून त्यातील १०६ कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. सध्या ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सध्या कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये आठ, सेनगाव १२, हिंगोली २९, वसमत १२, जिल्हासामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात औंढा पाच, सूजखेडा एक, सामुदाय आरोग्य अधिकारी एक, पहेणी चार, माझोड एक, चोंढी खुर्द एक, बाराशिव दोन, रिसाला बाजार एक असे एकूण ७७ रुग्ण उपचार घेत आहेत.
हेही वाचा - Breaking : हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये दुहेरी चिंता, सकाळी पुन्हा जमिनीतून आवाज
दोन हजार ३४८ संशयितांना भरती
दरम्यान, आतापर्यंत दोन हजार ३४८ संशयितांना भरती करण्यात आले होते. यातील दोन हजार सात जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून एक हजार ९५५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या ३८१ संशयित भरती आहेत.
७७ रुग्णांवर उपचार सुरू
यापैकी २३६ जणांचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित १८३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १०६ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
होमिओपॅथिक औषधींचे मोफत वाटप
पोतरा : कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. प्रेमेंद्र बोथरा यांच्यातर्फे मंगळवारी (ता.दोन) घरोघरी मोफत कोरोना प्रतिकारक होमिओपॅथिक औषधींचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आपापल्या परीने अनेक जण गरजूंना मोफत धान्य, किराण किटचे वाटप करीत आहेत.
येथे क्लिक करा - धोकादायक : ५४३ वर्गखोल्या बनल्या धोकादायक
ग्रामस्थांची उपस्थिती
यात पोतरा येथील भूमिपुत्र तसेच होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. प्रेमेंद्र बोथरा यांनी पोतरा गावात सहा ते साडेसहा हजार ग्रामस्थांना घरोघरी जाऊन कोरोना प्रतिकारक होमिओपॅथिक औषधींचे वाटप केले.या वेळी सरपंच ज्योती रणवीर, माजी सरपंच रघुनाथ मुलगीर, श्रीकांत मुलगीर, विजय मुलगीर, पोलिस पाटील श्रीमती मारकोळे, सोपान रणवीर, देवानंद मुलगीर, भाऊराव खुडे, ग्रामसेवक आर. डी. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.