esakal | हिंगोली : कळमनुरीत धुमस्टाईल दुचाकी चालविणाऱ्या युवकांची संख्या वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दिवाळीच्या सणानिमित्त सध्या बाजारपेठेत महिला व नागरिकांची विविध खरेदीसाठी गर्दी होत आहे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या अरुंद मार्गामुळे मोठ्या प्रमाणावर खरेदी साठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे रस्ते गर्दीने फुलून गेली असतानाच या गर्दीमधून शहरातील काही युवकांच्या टोळक्या कडून भरधाव मोटरसायकल पळविण्याचे फॅड निर्माण झाले आहे.

हिंगोली : कळमनुरीत धुमस्टाईल दुचाकी चालविणाऱ्या युवकांची संख्या वाढली

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जिल्हा हिंगोली : शहरांमधून अल्पवयीन युवकाकडून भरधाव मोटरसायकल पळविण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे या सर्व प्रकारामुळे बाजारपेठेत जाणाऱ्या महिला व पादचारी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे कळमनुरी पोलिसांनी दुर्लक्ष चालविल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

दिवाळीच्या सणानिमित्त सध्या बाजारपेठेत महिला व नागरिकांची विविध खरेदीसाठी गर्दी होत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या अरुंद मार्गामुळे मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे रस्ते गर्दीने फुलून गेली असतानाच या गर्दीमधून शहरातील काही युवकांच्या टोळक्याकडून भरधाव मोटरसायकल पळविण्याचे फॅड निर्माण झाले आहे.

हेही वाचा -  नांदेड : 34 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी, 29 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू -

जुना पोलीस स्टेशन, बस स्थानक, जुना बस स्थानक या मार्गावर अल्पवयीन युवकांकडून भरदार मोटरसायकल चालविण्याच्या प्रकारामुळे महिला व पादचारी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे, गर्दीमधून ट्रिपल सीट व डबल सीट भरधाव मोटर सायकल चालवताना युवकांकडून महिला व नागरिकांना कट मारण्याचा प्रकार देखील अवलंबिल्या जात आहे,. या प्रकाराबाबत कोणी जाब विचारल्यास अरेरावी करून शिवीगाळ करून दमदाटी केली जात आहे पोलीस प्रशासनाकडून शहरांमधून भरधाव पणे मोटर सायकल चालविणाऱ्या अल्पवयीन युवका बाबत कुठलीही भूमिका घेतली जात नसल्यामुळे या बाईक रायडर युवकांमध्ये पोलिस प्रशासनाच्या कारवाईबाबत भीती शिल्लक राहिली नाही परिणामी वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही अनेक अल्पवयीन युवक धूम स्टाईलने शहरातून मोटर सायकल चालवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत शहरातील पोलीस ठाण्याची इमारत शहराबाहेर असल्यामुळे पोलीस प्रशासनाचे शहरात म्हणावे तसे लक्ष राहिले नाही त्यामुळे या प्रकारात वाढ झाली आहे. पोलिसांनी तातडीने भरधाव मोटर सायकल चालवणाऱ्या अल्पवयीन बाईक रायडर चा बंदोबस्त करण्याची मागणी पुढे आली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे