esakal | हिंगोली : घरकुलांसाठी एक कोटी सहा लाखाचा निधी प्राप्त- खासदार हेमंत पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून रखडलेला १७८ घरकुलांचा  १ कोटी ६ लक्ष  ८० हजार  रुपयांचा दुसऱ्या हप्त्याचा निधी सातत्याने पत्रव्यवहार आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मंजूर करून घेतला.

हिंगोली : घरकुलांसाठी एक कोटी सहा लाखाचा निधी प्राप्त- खासदार हेमंत पाटील 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : कळमनुरी नगरपरीषद अंतर्गत प्रधानमंत्री शहरी घरकुल योजनेचा निधी मागील अनेक दिवसांपासून रखडलेला होता.याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून रखडलेला १७८ घरकुलांचा एक कोटी सहा लक्ष ८० हजार  रुपयांचा दुसऱ्या हप्त्याचा निधी सातत्याने पत्रव्यवहार आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मंजूर करून घेतला. नगरपरिषद कळमनुरी यांना निधी प्राप्त झाला असून लाभार्थ्यांना निधीचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे. 

प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तीच स्वप्न असते की आपले स्वतःचे एक घर असावे या स्वप्नपूर्तीसाठी कळमनुरी शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरवात करण्यात आली. कळमनुरी नगरपरिषद अंतर्गत  घटक क्र.४ अन्वये १७८ लाभार्थ्यांचा डी.पी.आर डिसेंबर २०१८ मध्ये मंजूर करण्यात आला होता,त्याचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना राज्यशासनाकडून  मे २०१९ मध्ये  प्राप्त झाला होता त्या नंतर मात्र काही कारणामुळे आणि नंतरच्या  लॉकडाऊनमुळे उर्वरित निधी रखडला होता.खासदार हेमंत पाटील यांनी यामध्ये लक्ष देऊन संबंधित विभागाला सातत्याने पाठपुरावा करून प्रसंगी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून तात्काळ निधी मंजूर करावा अशी मागणी केली, आणि  याबाबत नगरपरिषदेने सातत्याने पाठपुरावा करून अहवाल सादर करावा असे सांगितले होते. 

हेही वाचा -  Good News ; प्लाझ्मा थेरपीची आज परभणीत शक्यता...

हिंगोली लोकसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास

पहिल्या टप्यात १७८ लाभार्थ्यांना ७१ लक्ष २० हजाराचा निधी राज्यशासनकडून मिळाला होता आणि नगरपरिषदेकडून तात्काळ वाटप करण्यात आला होता.मात्र उर्वरित दुसऱ्या  हप्त्यासाठी लाभार्थ्यांना वाट पाहावी लागली . यामध्ये खासदार हेमंत पाटील यांनी लक्ष घालून १ कोटी ६ लक्ष ८० हजाराचा निधी मिळवून दिला. खासदार हेमंत पाटील हे  हिंगोली लोकसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास या उद्देशाने चंग बांधून कार्य करत आहेत.घरकुल निधी साठी खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , उपमुख्यमंत्री तथा अजित पवार , म्हाडा गृहनिर्माण संस्था यांना  कोरोना आणि लॉकडाऊन च्या काळात सातत्याने पाठपुरावा केला होता यासर्व बाबीचे फलित म्हणून शहरातील घरकुलांचा रखडलेला निधी प्राप्त झाला.

येथे क्लिक करा नांदेड- महावितरण कंपनीच्या बदनामी मागे कुणाचा हात, विज ग्राहकावर दुहेरी संकट, कसे? ते वाचाच

अशी माहिती मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांनी दिली

लवकरच कळमनुरी नगरपरिषदेकडून लाभार्थ्यांना देयकाचे वाटप करण्यात येणार आहे आणि केंद्र सरकारच्या निधीसाठी सुद्धा खासदार हेमंत पाटील पाठपुरावा  करणार आहेत  अशी माहिती मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांनी दिली. कळमनुरी शहरात राहणाऱ्या गरीब माणसाचे घराचे स्वप्न खासदार हेमंत पाटील यांच्यामुळे पूर्ण होणार आहे. याबाबत घरकुल लाभार्थ्यानी खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे