नांदेड-  महावितरण कंपनीच्या बदनामी मागे कुणाचा हात, विज ग्राहकावर दुहेरी संकट, कसे? ते वाचाच 

शिवचरण वावळे
Thursday, 3 September 2020

लॉकडाउनमुळे अनेकांच्या हाताला कामे नाहीत. त्यामुळे लॉकडाउन दरम्यान आलेले विज बिल माप करण्याची ग्राहकांची मागणी आहे. परंतु लॉकडाउनच्या काळात आलेले बिल भरण्याची अनेकांची तयारी देखील आहे. थोडे थोडे बिल भरुन थकबाकी निल करण्याची मानसिकता तयार झाली आहे. अशातच बिल देण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीकडून बिल कमी केले सांगुन वरचे पैसे आताच द्या अशी मागणी होत आहे.

नांदेड ः लॉकडाउनमध्ये विज वितरण कंपनीने ग्रहकांना छापील बिले देणे बंद केले होते. आॅगस्ट महिण्यापासून ग्राहकांना छापील बिले घरपोच दिले जात आहे. दरम्यान अनेक ग्राहकांना ॲव्हरेज बिल दिले आहे. त्यात काही रक्कम कमी केली असल्याचे बिलावर दिसत असताना विज बिल देण्यासाठी घरी गेलेल्या व्यक्तीकडून बिल कमी केले आहे. वरचे पैसे द्या असे सांगुन बिल ग्राहकांकडून ५०० ते १००० रुपयापर्यंत पैशांची मागणी केली जात असल्याने ग्राहकांवर लॉकडाउनंतर दुहेरी संकट ओढवले आहे. 

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने लॉकडाउन करण्यात आले होते. लॉकडाउनमुळे महावितरण कंपनीचे कर्मचारी यांनी मिटर रिडिंग न घेता ग्राहकांना आॅनलाईन मिटर रिडिंग सबमिट करण्याच्या सुचना दिल्या होत्या. ज्यांनी आॅनलाईन मिटर रिडिंगची नोंद केली नव्हती, अशा विज ग्राहकांना सरासरी विज बिले दिले जात होते. सरासरी विज बिल हे प्रत्यक्षात येणाऱ्या विज बिलापेक्षा जास्त होते.  

हेही वाचा- नांदेड- २४ तासासाठी मिनी मंत्रालय बंद, २६ जण पॉझिटिव्ह

महावितरण कार्यलयाच्या हातावर तुरी 

एप्रिल ते आॅगस्ट २०२० दरम्यान ज्या ग्राहकांना सरासरी विज बिले दिले गेले त्यांनी विज बिल कमी करुन घेण्यासाठी विज वितरण कार्यालयात धाव घेत विज बिलात कपात करुन घेतली आहे. तर काही ग्राहकांना महावितरण कार्यालयाकडून विज बिलात कपात करुन दिले जात आहे. आॅगस्ट महिण्यापासून महावितरण कार्यलयाकडून छापील विज बिले दिली जात आहे. नेमका याचाच फायदा घेत बिल देण्यासाठी घरी आलेलेल्या व्यक्तीकडून चक्क विज महावितरण कार्यलयाच्या हातावर तुरी देण्याचे काम सुरु आहे. यातून महावितरण कार्यालयाची बदनामी होत असली तरी, याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांना पुसटशी कल्पनाही नसल्याचे सांगितले जाते. 

हेही वाचा- स्वॅब देण्यासाठी आलेल्या नागरिकांचे हाल  प्रशासनाचे दुर्लक्ष; महिला, मुलांची कुचंबना

संबंधित गुतेदारास बोलावून साहेबा समोर चौकशी करु

विज बिल वाटप करण्यासाठी एका कंपनीस काम दिले आहे. त्या कंपनीकडून बिले वाटण्यासाठी मुले लावून काम करुन घेतले जाते. मात्र छापील बिलामध्ये महावितरण कंपनी शिवाय मुळ बिलात कुणीही बदल करु शकत नाही. बिल कमी करुन दिले, आता वरचे पैसे देण्याची मागणी होत आहे. ही महावितरण कंपनीची बदनामी आहे. संबंधित गुतेदारास बोलावून याची चौकशी केली जाईल. 
- डी.डी. गीते, सहाय्यक लेखापाल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Whose hand is behind MSEDCL's notoriety, double crisis on electricity customers, how? Just read it