हिंगोली : आडगाव (रंजे) वळण रस्त्यावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात, एक ठार, 11 जखमी

सुरेश पवार
Friday, 27 November 2020

हट्टा येथील गुरुवारीचा आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करून रांजाळा , नागापूर येथील काही शेतकरी पिकअप क्रमांक एमएच ०४ एफ.जे. ६८१३ या वाहनाने गावाकडे जात होते .

हट्टा (जिल्हा हिंगोली) : वसमत तालुक्यातील आडगाव ( रंजे)  वळण रस्त्यावर सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.२६)  सायंकाळी सातच्या  सुमारास पिकअप उलटल्याने एकजण जागीच ठार तर अकरा जखमी झाल्याची घटना झाली आहे. 

हट्टा येथील गुरुवारीचा आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करून रांजाळा, नागापूर येथील काही शेतकरी पिकअप ( एमएच ०४ एफ.जे. ६८१३) या वाहनाने गावाकडे जात होते. आडगावपासून एक किलोमीटर अंतरावरील वळण रस्त्यावर पिकअप उलटल्यामुळे बंडू  वैद्य आठवडी (वय ४०) राहणार रांजाळा ता.औंढा यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा -  नांदेड : मनपा पशुवैद्यकीय रुग्णालयात यंत्रांचा अभाव -

तर जखमींमध्ये शेख शेतकरी बहोद्दीन शेख यूसूफऊद्दीन, शेख मतीन, एफ. जे. शेख अब्दुल, मीना  कूटाफळे ( जवळा बाजार ), कृष्णा चौधरी  ( रा . नागापूर ), पांडुरंग कुटाफळे, शंकर चौधरी, निवृत्ती चौधरी, गजानन  चौधरी ( चालक ), कुंडलिक चौधरी ( रा. नागापूर ता. वसमत ) मुरली सोनवणे, अशोक सारंग जखमी झाले आहेत. यांना १०८ रूग्णवाहीकेने परभणी येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. घटनास्थळी हट्टा पोलिस कर्मचारी जीवन गवारे, शेख मदार, सचिन सागळे, गणेश लेकुळे व आडगाव  येथील तरूणांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त जखमींना दवाखान्यात पाठविण्यास मदत केली. या बाबत हट्टा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: One killed, 11 injured in accident on Adgaon (Ranje) bypass road for second day in a row hingoli news